विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन घेतली जाणार, उदय सामंत यांची मोठी घोषणा
त्यामुळे नागरिकांना वारंवार नियमांचे पालन करावे असे आवाहन केले जात आहे. मात्र सध्याच्या कोरोनाच्या स्थितीचा मोठा परिणाम बोर्डाच्या परीक्षांवर झाला आहे.
राज्यात कोरोनाची परिस्थिती पाहता अधिक चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांना वारंवार नियमांचे पालन करावे असे आवाहन केले जात आहे. मात्र सध्याच्या कोरोनाच्या स्थितीचा मोठा परिणाम बोर्डाच्या परीक्षांवर झाला आहे. त्यामुळे आता दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. अशातच आता उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तर राज्यात लागू करण्यात आलेल्या कठोर निर्बंधामुळे ऑफलाईन परीक्षा घेणे मुश्किल आहे. त्यामुळेच ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.(Mt.Annapurna1 सर करणारी पहिला भारतीय महिला ठरली सातार्याची Priyanka Mohite; पहा फोटोज)
उदय सामंत यांची आज विद्यापीठाच्या कुलगुरुंसोबत बैठक झाली. त्यामध्ये अशी चर्चा झाली की, 13 विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाईन आणि ऑनलाईन सुरु होत्या. परंतु आता शिल्लक राहिलेल्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येतील असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. त्याचसोबत एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याकडे लक्ष दिले जाणार आहे. तसेच अंतिम वर्षाची (TY) सुद्धा परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच घेतली जाणार आहे.(SSC CHSL Exam वाढत्या कोरोना रूग्णसंख्येमुळे लांबणीवर; परीक्षेच्या नव्या तारखा यशावकाश जाहीर केल्या जाणार)
तसेच शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना सुद्धा अत्यावश्यक सेवेतमध्ये स्थान द्यावे अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचे ही उदय सामंत यांनी म्हटले आहे. राज्यातील 37 लाख कॉलेज विद्यार्थ्यांचे लसीकरण सुद्धा विद्यापीठाच्या मार्फत करण्याचा विचार करत असल्याचे सामंत यांनी म्हटले आहे. परीक्षेला बसणारे विद्यार्थ्यांचे वय हे 18 ते 25 वर्षाच्या दरम्यान असल्याने त्यांना लस देणे अत्यावश्यक आहे.