तुकाराम मुंढे यांनी CEO बळकावलं; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची केंद्र सरकारकडे लेखी तक्रार
गडकरी यांनी स्मार्ट सिटी घोटाळा प्रकरणात केंद्र सरकारला पत्र लिहिलं आहे. नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे सीईओ तुकाराम मुंढे यांचे वर्तन अवैध आणि घोटाळेबाज आहे. हे सीईओपददेखील त्यांनी बळकावलं आहे, असं नितीन गडकरी यांनी पंतप्रधान कार्यालयाला पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.
नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी साईओ (CEO) पद बळकावलं, अशी तक्रार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केंद्र सरकारकडे पत्र पाठवून केली आहे. गडकरी यांनी स्मार्ट सिटी घोटाळा (Smart City Scam) प्रकरणात केंद्र सरकारला पत्र लिहिलं आहे. नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे सीईओ तुकाराम मुंढे यांचे वर्तन अवैध आणि घोटाळेबाज आहे. हे सीईओपददेखील त्यांनी बळकावलं आहे, असं नितीन गडकरी यांनी पंतप्रधान कार्यालयाला पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.
नितीन गडकरी यांनी या पत्रात म्हटलं आहे की, तुकाराम मुंढे यांनी जेव्हा नागपूर महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला तेव्हाचं त्यांनी नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सीईओपदाची जबाबदारी बेकायदारित्या बळकावली. त्यानंतर मुंढे यांनी निविदा रद्द करणे, लॉकडाऊन काळात कंत्राटी कामगारांचे काम थांबवणे, असे विविध निर्णय घेतले. (हेही वाचा - राज्य शासनाचा मोठा निर्णय; ‘या’ विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवसांचा आठवडा, 4 जुलै पासून अंमलबजावणी)
यापूर्वी नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी तुकाराम मुंढे यांच्यावर स्मार्ट सिटीमध्ये 20 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. तसेच मुंढे यांनी मर्जीतल्या कंत्राटदारांना परस्पर कंत्राट दिलं, असंही त्यांनी म्हटलं होतं. या सर्वा आरोपांचादेखील नितीन गडकरी यांनी या पत्रात उल्लेख केला आहे. महापौरांचा अवमान म्हणजे नागपूरचा अवमान आहे. महापालिकेतील कारभारावर माझे बारकाईने लक्ष आहे. योग्यवेळी योग्य निर्णय घेण्यात येईल, असा गंभीर इशारादेखील नितीन गडकरी यांनी तुकाराम मुंढे यांना अप्रत्यक्षपणे दिला होता.