वर्धा: कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तरुणीला भरचौकात पेट्रोल टाकून जाळले

कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका तरुणीला भरचौकात पेट्रोल टाकून जाळण्यात आलं आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील नंदेरी चौकात ही घटना घडली. या महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या पीडितेची प्रकृती गंभीर आहे. हे कृत्य करणारा आरोपी पसार झाला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे हिंगणघाट परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

वर्धा जिल्ह्यात (Wardha District) आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे. कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका तरुणीला भरचौकात पेट्रोल टाकून जाळण्यात (Woman  Burnt With Petrol) आलं आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट (Hinganghat) येथील नंदेरी चौकात ही घटना घडली. या महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या पीडितेची प्रकृती गंभीर आहे. हे कृत्य करणारा आरोपी पसार झाला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे हिंगणघाट परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पीडित तरुणी ही एका महाविद्यालयात शिक्षिका असून ती सकाळी कामावर जाण्यासाठी घराबाहेर निघाली होती. त्यावेळी आरोपी पीडितेच्या मागावर होता. पीडित तरुणी हिंगणघाटातील नंदेरी चौकात पोहोचताच आरोपीने तिच्यावर पेट्रोल ओतले आणि तिला पेटवून दिले. त्यानंतर काही वेळेतच आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर स्थानिकांनी पीडितेला रुग्णालयात दाखल केले. सध्या पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, पीडितेची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. (हेही वाचा - फोनचा पासवर्ड सांगितला नाही म्हणून बायकोने नवऱ्याला जिवंत जाळले)

पीडितेला जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचे नाव विकेश नगराळे (रा. दारोडा) असे असून तो फरार झाला आहे. देशात अनेक ठिकाणी महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. भररस्त्यात महिलांवर अत्याचार होत असल्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.