Mumbra Accident: अनियंत्रित ट्रकची धडक, अल्पवयीन मुलाचा मृत्यू, मुंब्रा येथील घटना

या अपघातात १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला तर यात आणखी सहा जण जखमी झाले आहे.

Accident | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Mumbra Accident: ठाण्यातील मुंब्रा येथील इमारतीच्या कंपाऊंड वॉलवर सिमेंट मिक्सरचा ट्रकला धडक लागल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला तर यात आणखी सहा जण जखमी झाले आहे. ही घटना शनिवारी संध्याकाळी घडली. नासिर शेख असं मृताचे नाव आहे. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा-  हिट अँड रन प्रकरणाची नागपूर शहरात पुनरावृत्ती; दोन ठार, पाच जखमी; भरधाव कारने 8 मजूरांना चिरडले, चालकास अटक)

मिळालेल्या माहितीनुसार, अनियंत्रित सिमेंट मिक्सरचा ट्रक धडकली. या घटनेची माहिती प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. हा अपघात सम्राट नगर परिसरात शनिवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मुले परिसरात खेळत असताना हा ट्रक अनियंत्रित झाला आणि मुलांना धडक दिली. यात 14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले.

हा ट्रक मुंब्रा बायपासवरून जात होता. रियाझ खान हा ट्रक चालवत होता. तेव्हा त्याचे वाहनावरिल नियंत्रण सुटले. ही धडक इतकी भीषण होती की, भितींचे धडक देताच भिंतीचे अर्धे तुकडे झाले.  आशिक इनामदार या 15 वर्षीय तरुणाचा जखमींमध्ये समावेश आहे. अपघातानंतर रस्त्यावर बराच वेळ गोंधळ निर्माण झाला होता.

जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान शेख यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच, आपत्कालीन आणि बचाव वाहनांसह एक पथक घटनास्थळी पोहेचले. आरडीएमसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ट्रक हायड्रोलिक मशीनच्या मदतीने उचलण्यात आला. अपघातानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.