Ulwe Shocker: नवी मुंबई मध्ये उलवे च्या IMS School Bus चं स्टेअरिंग मद्यपीच्या हातात; सोशल मीडीयात व्हिडिओ वायरल (Watch Video)
भारतात कायद्यानुसार ड्रिंक अॅण्ड ड्राईव्ह हा गंभीर गुन्हा आहे.
नवी मुंबई (Navi Mumbai) मध्ये शाळकरी मुलांच्या बसचं स्टिअरिंग एका मद्यपीच्या हातात असल्याचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल झाला आहे. सोशल मीडीयात वायरल होत असलेली व्हिडिओ ही उलवे भागातील आहे. उलवेतील (Ulwe) आयएमएस शाळेच्या स्कूलबसचा (IMS School Bus) चालक मद्यप्राशन करून अगदी तर्राट अवस्थेत गाडीचं स्टिअरिंग पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचं पहायला मिळालं आहे. दरम्यान वायरल व्हिडीओ मध्ये उपस्थित नागरिक विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात असल्याचं बोलताना आढळून आलं आहे.तसेच त्याने एका रिक्षाला देखील धडक मारल्याची माहिती दिली आहे. ही घटना उलवेच्या सेक्टर 21 मधील असून सकाळ सकाळ चालक इतका 'झिंगलेल्या' अवस्थेत पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
मीडीया रिपोर्ट्सनुसार, आयएमएस शाळेच्या स्कूलबसमध्ये अंदाजे 40 विद्यार्थी होते. त्यांच्या जीवावर हा प्रकार बेतण्याआधीच सजग नागरिकांनी पोलिसांना हा प्रकार कळवला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यामध्ये कोणतीही मोठी दुर्घटना झालेली नाही. पण अशा प्रकारांवर वेळीच लक्ष दिल्यास मोठे अपघात होऊ शकतात. त्यामुळे पालक आणि शाळांनीही सतर्क राहणं गरजेचे आहे. नक्की वाचा: ड्रिंक अॅन्ड ड्राईव्ह रोखण्यासाठी मुंबई पोलिसांचं बॉलिवूड गाण्यांच्या बोलांवर चालकांसाठी संदेश (View Tweets) .
पहा वायरल व्हिडीओ
भारतात कायद्यानुसार ड्रिंक अॅण्ड ड्राईव्ह हा गंभीर गुन्हा आहे. पहिल्यांदा या गुन्हात आढळल्यास 6 महिन्यांची जेलवारी आणि दहा हजारांचा दंड आहे. तर दुसर्यांदा आढळल्यास 15 हजारांचा दंड आणि 2 वर्षांचा तुरूंगवासाची शिक्षा आहे.