Uniform Civil Code: समान नागरी संहितेच्या केंद्राच्या मागणीला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा
दरम्यान, शिवसेनेसोबत महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचा भाग असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने तटस्थ भूमिका स्वीकारली असून, ते यूसीसीला समर्थन देत नाहीत आणि विरोधही करत नाहीत.
Uniform Civil Code: समान नागरी संहिता (Uniform Civil Code, UCC) लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांना उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) शिवसेना (यूबीटी) पाठिंबा देईल, असे अनेक अहवालांत सांगण्यात आलं आहे. पक्षाने नेहमीच यूसीसीच्या कल्पनेला अनुकूलता दर्शवली आहे. परंतु अंतिम निर्णय मसुद्यातील तपशीलांवर अवलंबून असेल, असं पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे.
यूबीटी सेनेचे आणखी एक नेते आनंद दुबे यांनीही हे विधेयक मांडले जाईल तेव्हा पक्ष पाठिंबा देईल, असं म्हटलं आहे. इतर विरोधी पक्षांच्या सहकार्याने ते UCC प्रकरणाकडे कसे जायचे हे पक्षाचे वरिष्ठ नेते ठरवतील, असंही दुबे यांनी सांगितलं. (हेही वाचा - PM Narendra Modi Cabinet Expansion: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिंदे गटातून 5 नावे चर्चेत, महाराष्ट्रतील भाजप मंत्र्यांची पडणार विकेट? घ्या जाणून)
आम आदमी पार्टी या अन्य विरोधी पक्षाने समान नागरी संहितेला आपला तत्त्वतः पाठिंबा दर्शविला आहे. दरम्यान, शिवसेनेसोबत महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचा भाग असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने तटस्थ भूमिका स्वीकारली असून, ते यूसीसीला समर्थन देत नाहीत आणि विरोधही करत नाहीत. याउलट, काँग्रेसच्या राज्य युनिटने प्रस्तावित समान नागरी संहितेचा संभाव्य परिणाम तपासण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू बालचंद्र मुणगेकर यांच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्यीय समिती स्थापन केली आहे.
पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनादरम्यान केंद्र सरकार समान नागरी संहिता लागू करण्यासाठी विधेयक आणण्याची शक्यता आहे. हे विधेयक संसदीय स्थायी समितीकडे पाठवले जाण्याची शक्यता आहे, जी समान नागरी संहितेबाबत विविध भागधारकांकडून माहिती गोळा करेल.