Uddhav Thackeray: हा ‘चुना लगाव आयोग’ आहे, ते सत्तेचे गुलाम आहेत, उद्धव ठाकरेंचा खेडमधील सभेत हल्लाबोल
शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्याचा आयोगाने निर्णय घेतल्यानंतर पहिल्यांदाच जाहीर सभा घेतली.
शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेचं (Shivsena) नाव आणि पक्षचिन्ह शिवसेनेच्या शिंदे गटाला देण्याचा आयोगाने निर्णय घेतल्यानंतर पहिल्यांदाच जाहीर सभा ही खेडमध्ये (Khed) घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी, (Narendra Modi) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि निवडणुक आयोग (Election Commission of India) यांच्यावर जोरदार टीका केली. “मला निवडणूक आयोगाला खास सांगायचं आहे की, त्यांच्या डोळ्यात मोतीबिंदू झाला नसेल, तर कोणती शिवसेना खरी आहे हे पाहायला इकडं या. हा ‘चुना लगाव आयोग’ आहे. ते सत्तेचे गुलाम आहेत. वरून जे आदेश येतात त्याप्रमाणे वागणारे हे त्यांचे गुलाम आहेत. हे निवडणूक आयुक्त म्हणून राहायच्या लायकीचे नाहीत." अशी टिका उद्धव ठाकरे यांनी केली. (Sanjay Raut Statement: कलम 370 हटवल्याने काही फायदा नाही, काश्मिरी पंडित अजूनही मरत आहेत, संजय राऊतांची केंद्र सरकारवर टीका)
“शिवसेनेची स्थापना निवडणूक आयोगाच्या वडिलांनी नाही, तर माझ्या वडिलांनी केली आहे,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला. तसेच भाजपाला आधी गल्लीतलं कुत्रं विचारत नव्हतं, असं म्हणत खोचक टोला लगावला. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “शिवसेना फोडणारे मराठी माणसाच्या आणि हिंदुंच्या एकजुटतेवर घाव घालत आहेत. हिंदुत्वासाठी शिवसेनाप्रमुखांनी संपूर्ण आयुष्य वेचलं.
या सभेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. एकनाथ शिंदे यांनी आता अमित शाह यांना वडील म्हटलंय, त्यामुळे ते आता आपली संपत्ती चोरणार का याची चिंता जय शाह यांना लागली आहे असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. तुम्हाला पक्षप्रमुख म्हणून कोण हवंय... मी की मिंधे असा प्रश्नही त्यांनी विचारला.