Devendra Fadnavis on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांना मानसोपचार तज्ज्ञाची गरज- देवेंद्र फडणवीस

त्यावर प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता देवेंद्र फडणवीस बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथे आपल्या कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांसोबत बोलताना देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जहाल टीका केली होती. त्यानंतर राज्यभरात भाजप आक्रमक झाला आहे.

Uddhav Thackeray And Devendra Fadnavis (Photo Credit - Twitter)

Uddhav Thackeray Vs. Devendra Fadnavis: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर राजकीय परिस्थितीचा फारच परिणाम झाला आहे. त्यामुळे ते काहीही बोलत आहेत. त्यांना मानसोपचारतज्ज्ञाची गरज आहे. जेव्हा असा एखादा व्यक्ती काही बोलत असतो तेव्हा त्यावर प्रतिक्रिया द्यायची नसते, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख 'नागपूरचा कलंक' अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यावर प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता देवेंद्र फडणवीस बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथे आपल्या कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांसोबत बोलताना देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जहाल टीका केली होती. त्यानंतर राज्यभरात भाजप आक्रमक झाला आहे.

उद्धव ठाकरे यांनी आज (11 जुलै) दुपारी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार हल्ला चढवला. मी वापरलेला कलंक हा शब्द इतका लागेल असे मला अजिबात वाटले नव्हते. बरं, त्या शब्दांमध्ये इतके लागण्यासारखे काहीच नव्हते. तरीही तो शब्द त्यांना लागला असला तर त्यांनी सांगावे, एखाद्या नेत्यावर, व्यक्तीवर, त्याच्या कुटुंबावर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करणे हा कलंक नाही काय? ज्या कुटुंबावर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, त्यांना बदनाम कराये आणि पुन्हा त्यांच्याच मांडीला मांडी लावून सत्तेत आणि मंत्रिमंडळात बसायचे हा प्रकार म्हणजे कलंक नाही का? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी भाजपला विचारला. (हेही वाचा, Uddhav Thackeray On CM Eknath Shinde: अजित पवार यांच्यामुळे मिंदे यांच्या 'नाकी नऊ' आले; उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात)

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. उद्धव ठाकरे हेच खरे महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. त्यांनी आपल्या सख्ख्या भावाला घरातून बाहेर काढले, त्यांनी आपल्या वडिलांना एकवेळ निट जेऊ घातले नाही तो आहे कलंक. ज्यांनी मुख्यमंत्री असताना जलस्वराज्य सारखी योजना बंद पाडली ते उद्धव ठाकरे कलंकीत आहेत, असे बरेच आरोप बावनकुळे यांनी केला. हे आरोप करताना त्यांनी प्रत्येक वाक्यात कलंक शब्द वापरण्याचा प्रयत्न केला.