IPL Auction 2025 Live

महाराष्ट्र सरकाराची पत्रकार, मीडियावर दहशत- देवेंद्र फडणवीस

त्याचसोबत पत्रकारांची सुद्धा मुस्काटदाबी केली जात असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस (File Image)

भाजप पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर टीका करत असे म्हटले आहे की, राज्यात अघोषित आणीबाणी सदृष्य आणि अभूतपूर्व परिस्थितीआहे. त्याचसोबत पत्रकारांची सुद्धा मुस्काटदाबी केली जात असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची फडवणीस यांनी भेट घेतली. त्यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, ज्येष्ठ नेते आशिष शेलार आणि विनोद तावडे तसेच मुंबई पक्षाचे प्रमुख मंगल प्रभात लोढा हे होते.

फडणवीस यांनी असा दावा केला आहे की, एबीपी माझाचे पत्रकार राहुल कुलकर्णी यांना वांद्रे स्थानकातील गर्दी प्रकरणी अटक करण्यात आली होती. तसेच लॉकडाउनच्या काळात त्यांनी राज्य सरकारने डीएचएफएलच्या वाधवान बंधूंना मुंबई ते महाबळेश्वर प्रवास करण्याच्या पत्राचा खुलासा केला होता. या प्रकरणी त्यांच्या विरोधात मुंबईत गुन्हा ही दाखल करण्यात आला. राहुल कुलकर्णी यांना कोरोनामुळे लॉकडाउनचे आदेश जाहिर केले असले तरीही त्यांना उस्मानाबाद येथून मुंबईत आणण्यात आल्याचे ही फडणवीस यांनी म्हटले आहे.

त्याचसोबत Times Now चे पत्रकार यांच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मीडियाला नकारात्मक बातम्यांच्या संदर्भात स्पष्टीकरण देण्यास सांगितले जाऊ शकते. परंतु गुन्हे दाखल करणे आणि त्यांना अटक करणे हे माध्यमांना दहशत दाखविण्यासारखे आहे, असा दावा माजी मुख्यमंत्र्यांनी केला. पुढे फडवणीस यांनी पत्रकार अर्णव गोस्वामी यांचा मुद्दा उपस्थित करत न्यूज कार्यक्रमासंदर्भात त्यांना 12 तास ताब्यात घेण्यात आले होते.(मुंबई: उत्तर भारतीय संघटना अध्यक्ष विनय दुबे याला वांद्रे कोर्टाकडून जामीन मंजूर)

 सोशल मीडियात सरकारच्या विरोधात भाष्य करणाऱ्यांची मुस्काटदाबी केली जात आहे. तर आरोग्य धोक्याच्या नावाखाली वृत्तपत्रांचे वितरणदेखील कमी करण्यात आले आहे. ऐवढेच नाही तर कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कंन्टेंटमेंट परिसरात घरोघरी जाऊन वृत्तपत्रांचे वाटप करण्यास सुद्धा सरकारने बंदी घातली आहे. तर राज्यपालांनी हस्तक्षेप करावा असे ही फडवणवीस यांनी म्हटले आहे.