Uddhav Thackeray | (Photo Credit - Twitter)

शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज ठाणे दौऱ्यावर आहेत. आपल्या 'मातोश्री' निवासस्थानावरुन ते ठाण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेना पक्षात दोन गट निर्माण झाले आहेत. यावरुन कायदेशीर लढायाही सुरु आहेत. दरम्यान, या बंडानंततर उद्धव ठाकरे प्रथमच ठाणे (Uddhav Thackeray Thane Visit) येथे येत आहेत. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पाठिमागील अनेक वर्षे ठाण्यात शिवसेनेची सत्ता आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या रुपात शिवसेना नेतृत्वाला आव्हानही ठाण्यातूनच मिळाले आहे. त्यामुळे आजच्या ठाणे दौऱ्यात उद्धव ठाकरे काय बोलतात. पक्ष संघटना मजबूतीसाठी कोणती व्यूव्हरचना करतात याबाबत उत्सुकता आहे.

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आजच्या ठाणे दौऱ्यात महाआरोग्य शिबीराचे उद्घाटन होणार आहे. ज्याचे आयोजन शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षाद्वारे करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे ठाण्यात येऊन काय बोलणार याबाबत उत्सुकता असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र या दौऱ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. (हेही वाचा, Maharashtra Politics: नवा रस्ता आणि एक नवीन नाते म्हणत उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांमध्ये हातमिळवणी)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर ध्वजारोहण केले. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी प्रसारमाध्यमांनी उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याविषयी विचारले असात 'लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार असतो' असे म्हणत प्रतिक्रिया दिली. दरम्यान, लवकरच मंत्रीमंडळ विस्तार केला जाईल, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.