Udayanraje Bhosale on Maratha Reservation: देवेंद्र फडणवीस यांच्या हातात सत्ता द्या, मी आरक्षण मिळवून देतो; उदयनराजे भोसले यांची राज्य सरकारवर टीका

Udayanraje Bhosale | (Photo Credits: Facebook)

Udayanraje Bhosale on Maratha Reservation: मराठा आरक्षणाबद्दल आज खासदार उदनराजे भोसले यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षाच्या मुद्द्यावर राज्य सरकारवर खोचक टीका केल्याचे दिसून आले आहे. त्यांनी या मुद्द्यावरुन बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्या हतात सत्ता द्या मी आरक्षण मिळवून देतो असे विधान उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे. त्याचसोबत मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे असे ही उदयनराजे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.(मुख्यमंत्र्यांनी सामना ला दिलेल्या मुलाखतीत केवळ धमक्या दिसल्या वर्षपूर्तीचा आढावा नाही- देवेंद्र फडणवीस)

उदयनराजे भोसले राजे यांनी पुढे असे ही म्हटले की, आधीच्या पीढीमधील लोकांनी जाणूनबुजून मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित ठेवला आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा नाहीतर अनर्थ होईल असे ही उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे. ऐवढेच नाही प्रत्येक निवडणूकीवेळी यावर तोडगा निघणार असे म्हटले जाते. परंतु त्याचे पुढे काहीच होत नाही. त्यामुळे मराठा समाजाचा सोडवता येत नसल्यास राजीनामा देऊन घरात बसावे असा हल्लाबोल उदयनराजे यांनी केला आहे.(Kirit Somaiya on Thackeray Government: 'ठाकरे सरकार उत्तर द्या' म्हणत वर्षपूर्ती निमित्त किरीट सोमय्या यांनी विचारले 10 प्रश्न)

तसेच आरक्षण कमी करुन ते मागितले जात नाही आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्वधर्म समभाव भुमिकेप्रमाणे आम्ही चालत आहोत. त्यामुळे आमदार खासदारांची नैतिकता आहे हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे असे ही उदयनराजे यांनी म्हटले आहे. अन्य समाजावर ही अन्याय झाल्यास त्यांच्या बाजूने ही आम्ही उभे राहू असे ही त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.