Uday Samant and Uddhav Thackeray: उदय सामंत थेट उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात? माजी खासदाराचा खळबळजनक दावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील नेते आणि सरकारमधील मंत्री उदय सामंत (Uday Samant) हे थेट शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या संपर्कात आहेत, असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
Chandrakant Khaire On Uday Samant: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा अंतिम फैसला अगदी शेवटच्या टप्प्यात आला असताना माजी खासदार आणि शिवसेना (UBT) पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील नेते आणि सरकारमधील मंत्री उदय सामंत (Uday Samant) हे थेट शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या संपर्कात आहेत, असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. शिवाय, अपात्रतेची टांगतील तलवार असलेल्या 16 आमदारांमध्ये उदय सामंत यांचा समावेश नाही. इतकेच नव्हे शिंदे गटात दाखल झालेल्या शेवटच्या काही आमदारांमध्ये उदय सामंत यांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांचे मनपरिवर्तन होऊन ते पुन्हा आमच्याकडे येऊ शकतात, असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
चंद्रकांत खैरे पुढे बोलताना म्हणाले की, कोर्टात काय होईल हे माहिती नाही. पण उद्धव ठाकरे यांचाच मोठा विजय होईल, असा विश्वास चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला आहे. राज्याच्या राजकीय वर्तुळात फडणवीस गटाने सुरु केलेली धावपळ, राज्याच्या सरकारी अधिकाऱ्यांमध्ये सुरु असलेली गडबड पाहता निकाल ठाकरे यांच्याच बाजून लागेल असा विश्वास अनेकांना वाटतो. यात कायदेतज्ज्ञांनाही तसेच वाटते, असे खैरे म्हणाले. (हेही वाचा, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालय आज निकाल देण्याची शक्यता)
आपण हिंदुत्त्ववादी असलो तरी देवभक्तही आहे. आपण कोर्टाला विनंती करु शकत नाही. परंतू, उद्धव ठाकरे यांच्या बाजूने हा निकाल लागू दे अशी देवाकडे प्रार्थना आपण निश्चितच करु शकतो. कर्टाच्या निकालानंतर जेकाही जाणार आहे त्यावर काय बोलायचे. पण, जे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्याबद्दल काहीही बोलत होते ते कोर्टाच्या निकालानंतर बाद होतील, त्यांच्या वक्तव्यांना काहीही अर्थ राहणार नसल्याचेही खैरे यांनी म्हटले आहे. शिंदे गटातील लोकांनी जी मस्ती दाखवली ती मस्ती लोकांना आवडली नसल्याचेही खैरै म्हणाले.