Bhandup मध्ये मॅनहोलमध्ये पडलेल्या 2 महिलेच्या घटनेची महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडून दखल; Protective Grills ने सारी मॅनहोल सुरक्षित करणार असल्याची दिली माहिती
बीएमसीच्या अख्त्यारीमध्ये असलेल्या 73 हजार मॅनहोल पैकी बहुतांश मॅनहोलला प्रोटेक्टीव्ह ग्रिल्स आहेत पण लवकरच सार्या मॅनहोलला या ग्रिल्स लावल्या जातील असे देखील आश्वासन पेडणेकरांनी दिले आहे.
भांडूप मध्ये काल दोन महिला मॅनहोल मध्ये पडल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान या दुर्घटनेची मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दखल घेतली आहे. त्याविषयी बोलताना मॅनहोल वरील झाकण हे फायबर प्रोटेक्टिव्ह कव्हर असल्याने पाण्याच्या दाबामुळे हरवल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या घटनास्थळी किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishor Pednekar) स्वतः गेल्या होत्या आणि आता झाकणाची सोय केली असल्याचंही म्हटलं आहे. दरम्यान या दुर्घटनेमध्ये दोन्ही महिला सुरक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. Mumbai Rains: मुंबईकरांसाठी Open Manhole ठरतायत जीवघेणे; पाहा व्हिडिओ.
दरवर्षी पावसाळ्यामध्ये अशाप्रकारच्या घटना होत असल्याने आता त्यावरून राजकारण पेटायला देखील सुरूवात झाली आहे. या आरोप-प्रत्यारोपालाही किशोरी पेडणेकरांनी उत्तर दिले आहे. फायबर प्रोटेक्टेड कव्हर मुंबई महानगर पालिकेमध्ये सार्या पक्षांकडून मंजूर करण्यात आली आहेत. चोरी टाळण्यासाठी फायबर कव्हरचा विचार करण्यात आला असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. पण आता नवी कव्हर्स लावली जाणार असल्याची देखील महापौरांनी माहिती दिली आहे.
महापौर किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया
दरम्यान आज महापौरांनी दिलेल्या माहितीनुसार,दरम्यान आज महापौरांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएमसीच्या अख्त्यारीमध्ये असलेल्या 73 हजार मॅनहोल पैकी बहुतांश मॅनहोलला प्रोटेक्टीव्ह ग्रिल्स आहेत पण लवकरच सार्या मॅनहोलला या ग्रिल्स लावल्या जातील असे देखील आश्वासन पेडणेकरांनी दिले आहे.
काही वर्षांपूर्वी एका डॉक्टरचा मॅनहोलमध्ये पडून वरळी परिसरात मृत्यू झाला होता. या मनाला चटका लावून जाणार्या घटनेनंतर पालिका अदहिक सतर्क झाली आहे.