Mumbai Pune Express Highway Accident: मुंबई पुणे महामार्गावर भीषण अपघात; दोन महिलांचा जागीच मृत्यू
मुंबई-पुणे महामार्गावर खोपोलीजवळ झालेल्या भीषण अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला.
Mumbai Pune Express Highway Accident: मुंबई पुणे महामार्गावर अपघाताची मालिका सुरु आहे. मुंबई पुणे महामार्गावर भीषण अपघात झाल्याची धक्कादायक दुर्घटना समोर आली आहे. या घटनेत दोन महिलांनी जीव गमावल्याचे सांगितले जात आहे. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं भरधाव कंटेनरने कारला जोरदार घडक दिली. कारमध्ये बसलेल्या दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत आणखी पाच महिला गंभीर अवस्थेत असल्याचे उघडकीस आले आहे. गंभीर झालेल्या महिलांना रुग्णालयात उपाचारासाठी नेण्यात आले आहे.
चालकाचा कंटेनर वरिल नियत्रंण सुटल्याने हा अपघात घडून आला. या घटनेत दोन महिलाचा जागीच मृत्यू झाला. कार मधील सर्व महिला या मुंबईतील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई-पुणे महामार्गावरील खोपोली नजीक हा अपघात झाला आहे. महामार्गावर अपघात झाल्याने काही काळ वाहतुक कोंडी झाली होती. या अपघातात मुंबईतील दादर येथे राहणाऱ्या बकुळ राऊत आणि तेजस्विनी राऊत यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे
अपघाताची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीसांनी या घटनेची नोंद घेतली. जखमी महिलांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याशिवाय दोन्ही महिलांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.अपघातग्रस्त वाहनं रस्त्यावरून बाजूला हटवण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आल्याची माहिती आहे. [Poll ID="null" title="undefined"]