पुणे-सातारा रोडवरील गाड्यांनी घेतला पेट; 3 बाईक्स जळून खाक

रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या गाड्या पेटवून देण्याचा प्रकार पुण्यातून समोर येत आहे.

Image used for Representational Purpose | (Photo Credits: Pixabay)

रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या गाड्या पेटवून देण्याचा प्रकार पुण्यातून समोर येत आहे. पुणे-सातारा रोडवरील (Pune Satara Road) बालाजीनगर (Balaji Nagar) येथील एलोरा पॅलेस येथे मध्यरात्रीच्या सुमारास पार्क केलेल्या दुचाकींना आग लावण्यात आली. या आगीत 6 बाईक्स जळून खाक झाल्या.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवत आग विझवली. या आगीत 3 बाईक्स जळून खाक झाल्या असून 3 बाईक्स अर्धवट जळल्या आहेत. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली का कोणी गाड्या पेटवून दिल्या हे अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement