पुणे: बांधकाम सुरू असलेल्या मंदिराचा स्लॅब कोसळला; दोघांचा मृत्यू, 4 मजूर जखमी
पिंपळे गुरव स्मशानभूमी परिसरात महादेवाच्या मंदिरामध्ये सभामंडप उभारण्याचं काम सुरु होतं. मात्र दुपारी स्लॅब कोसळला आणि काही मजूर या स्लॅबच्या ढिगार्याखाली सापडले.
पुण्यामध्ये बांधकाम सुरू असलेल्या एका मंदिरामध्ये आज अपघात झाला आहे. या दुर्दैवी प्रकारामध्ये मंदिराचा स्लॅब कोसळल्याने दोन मजूरांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जखमी मजुरांना तात्काळ नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हा प्रकार पुण्यातील पिंपळे गुरव रेसिडेन्शिल ( Pimple Gurav residential area)भागातील आहे. स्थानिकांच्या मदतीने मजूरांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.
पिंपळे गुरव स्मशानभूमी परिसरात महादेवाच्या मंदिरामध्ये सभामंडप उभारण्याचं काम सुरु होतं. मात्र दुपारी स्लॅब कोसळला आणि काही मजूर या स्लॅबच्या ढिगार्याखाली सापडले. स्थानिक लोकं आणि अग्निशामक दलाच्या गाड्या अपघात स्थळी पोहचल्या आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
लखनऊ सुपर जायंट्सचे मालक Sanjiv Goenka यांच्याकडून तिरुपती बालाजी मंदिरात 5 कोटींचे सोने दान (Video)
Dress Code in Mahalaxmi And Jyotiba Temples: कोल्हापूरची महालक्ष्मी आणि ज्योतिबा मंदिरांमध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लागू; ठिकाणांची पवित्रता आणि सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने घेतला निर्णय
Advertisement
Advertisement
Advertisement