Buldhana Accident: दुचाकी आणि कंटनेरच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू, बुलढाणा येथील घटना

बुलढाणात एक भीषण अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागपूर पुणे- मुंबई महामार्गावर दुचाकी आणि कंटेनकच्या धडकेत भीषण अपघात झाला आहे.

Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

Buldhana Accident: बुलढाणात एक भीषण अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागपूर पुणे- मुंबई महामार्गावर दुचाकी आणि कंटेनकच्या धडकेत भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर रस्त्यावर वाहतुक कोंडी झाली होती. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. बारावीच्या दोन मुलांचा नांदेड येथे अपघात झाला होता. दरम्यान रस्त्या अपघातामुळे नागरिकांनी सुरक्षतेचा प्रश्न उपस्थित केला आहे.  हेही वाचा-दुचाकीची झाडाला धडक लागल्याने बारावीतल्या 2 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत, 

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर, पुणे मुंबई महामार्गावर अंजनी खुर्द गावा जवळ कंटनेर आणि दुचाकी यांच्या धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर महामार्गावर रस्त्यावर वाहतुक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस अपघातस्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघात मृत्यू झालेल्या तरुणांना बाहेर काढले.

रामेश्वर कांबळे आणि पंडित भरसाखले असं भीषण झालेल्या तरुणांची ओळख झाली आहे. या अपघातातील कंटनेर चालक घटनास्थळावरून फरार झाले आहे, पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून चालकाचा शोध घेत आहे. पोलिसांनी रस्त्यावरील वाहतुक सेवा सुरळीत केली. पोलिसांनी मृतदेहांना शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement