Nanded Shocker: दुचाकीची झाडाला धडक लागल्याने बारावीतल्या 2 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत, माहुर तालुक्यातील घटना
नांदेड येथील माहूर तालुक्यात बाराबीच्या दोन विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे
Nanded Shocker: नांदेड येथील माहूर तालुक्यात बाराबीच्या दोन विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यार्थी बाराबीचा पेपर सोडवून घरी परतत होते तेव्हा ही घटना घडली. तर अपघातात आणखी एक जण जखमी झाला आहे. या घटनेमुळे माहुर येथे एकच खळबळ उडाली आहे. तर जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. (हेही वाचा- अनियंत्रित कारची धडक लागल्याने वृध्दाचा मृत्यू, लालबाग येथील घटना)
मिळालेल्या माहितीनुसार,विद्यार्थी हे दहेली तांडा येथील स्व. संगीताबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत होते. तर अंजनगाव येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीची परिक्षा देण्यासाठी गेले होते. प्रतिक लेंडे आणि कृष्णा बोंतावर असं अपघातात मृत्यू झालेल्या मुलांचे नाव आहे. तर गणेश तोटावार असं जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
2 मार्च रोजी सकाळी 11 ते दुपारी 2ना वाजे दरम्यान पेपर सोडवून घरी परतताना त्यांच्या अनियंत्रित दुचाकीची धडक झाडाला लागली. यात दोघे जण गंभीर जखमी होवून दोघांचा ही जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच, स्थानिकांनी अपघाताग्रस्तांना मदत केली. जखमीला यवतमाळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मृतांच्या पालकांना घटनेची माहिती देण्यात आली. दोघांच्या कुटुंबियावर दुखाचा डोंगर कोसळला. कुटुंबियांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले. या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Mar 03, 2024 07:53 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

