Akola: अकोला जिल्ह्यातील बाळापूर गावात 'मन' नदीत बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केलं. या घटनेची माहिती मिळताचं मृत मुलांच्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांना हंबरडा फोडला.
Akola: अकोला जिल्ह्यातून (Akola District) अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील बाळापूर शहरातील मन नदीत दोन लहान चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. मोहम्मद नब्बान मोहम्मद फहीम (वय,7) आणि दानियाल मोहम्मद फैय्याज (वय, 9) अशी या दोन्ही मृत मुलांची नाव आहेत. प्राप्त माहितीनुसार, हे दोघे रविवारी मन नदीकाठी खेळत होती. प्राथमिक अंदाजानुसार, अचानक तोल जाऊन पाय घसरल्याने ही दोघे नदीत बुडाली असावीत.
या घटनेमुळे संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे. तसेच मृत्यू मुलाच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. (हेही वाचा -Nashik Suicide Case: नाशिकमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या; वडील आणि दोन मुलांनी गळफास लावून संपवली जीवनयात्रा)
बाळापूर शहरातील मन नदीकाठी अनेक घरे आहेत. दररोज नदीकाठावर अनेक मुलं खेळत असतात. रविवारी ही दोन चिमुकले मन नदीकाठी खेळत होते. मात्र, अचानक तोल गेल्याने हे दोघे पाय घसरून नदीत पडले. याची माहिती मिळताचं स्थानिकांनी नदीकाठी धाव घेतली. परंतु, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. नदीत बुडाल्याने या दोघांचा मृत्यू झाला होता.
गावकऱ्यांनी या दोघांना तात्काळ अकोल्यातील शासकीय रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केलं. या घटनेची माहिती मिळताचं मृत मुलांच्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांना हंबरडा फोडला. गेल्या अनेक दिवसांपासून मन नदीवर भींत बांधण्याची मागणी होत आहे. परंतु, अद्याप त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. नदीवर सुरक्षा कठडे नसल्याने येत्या काळात अनेक दुर्घटना घडू शकतात, असं मत येथील स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलं आहे.