Drink सोडवण्याचे औषध जीवावर बेतले, दोघांचा मृत्यू

दारु सोडवण्याचे औषध घेतल्याने दोन भावंडांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास करण्यास सुरुवात केली आहे.

फोटो सौजन्य- फाइल इमेज

दारु सोडवण्याचे औषध घेतल्याने दोन भावंडांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास करण्यास सुरुवात केली आहे.

बीडमधील परळी येथे संजय आणि विजय मुंडे यांनी दारु सोडवण्यासाठी हदगाव येथे आले होते. येथील डॉक्टरांकडे दारु सोडवण्याच्या उपचारासाठी आले होते. डॉक्टर रविंद्र पोधाडे यांनी त्या दोघांना सिरप दिले. त्यानंतर या दोघांनी परतीच्या प्रवासाठी निघाले. त्यावेळी संजयच्या पोटात आग होते आहे असे जाणवले आणि तो झोपून गेला. तर नांदेडला पोहताच त्याला उठविण्याचा विजयने प्रयत्न केला. मात्र त्याने काही उत्तर दिले नाही. तेव्हा नजीकच्या खासगी डॉक्टरांकडे अजयला नेण्यात आल्यानंतर त्याला मृत घोषित केले.

या प्रकरणी थोड्याच वेळात विजयलाही पोटात आग होत असल्याचे जाणवले. त्याला ही दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले. परंतु त्याचा ही मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत डॉक्टर रविंद्र पोधाडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement