Governor Made Slogan: तुळजाभवानी माता की जय! पुणे येथील कार्यक्रमात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 71 वा वाढदिवसानिमित्त (PM Narendra Modi 71st Birthday) पुणे येथे आयोजित एका कार्यक्रमात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घोषणाबाजी केली. एका कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच भगत सिंह कोश्यारी यांनी 'तुळजाभवानी माता की जय' (Tulja Bhavani Mata Ki Jai!) अशा घोषणा दिल्या.

Bhagat Singh Koshyari | (Photo Credits: Facebook)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 71 वा वाढदिवसानिमित्त (PM Narendra Modi 71st Birthday) पुणे येथे आयोजित एका कार्यक्रमात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घोषणाबाजी केली. एका कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari)  यांनी 'तुळजाभवानी माता की जय' (Tulja Bhavani Mata Ki Jai!) अशा घोषणा दिल्या. तसेच, मोठ्याने घोषणा द्या तुमचा आवाज पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहोचला पाहिजे. 'तुळजाभवानी माता की जय' घोषणनेनंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचाही जयजकार केला. राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत ‘पुणे ऑन पॅडेलस’ या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. राज्यपालांनी हिरवा झेंडा दाखवून या रॅलीला सुरुवात केली. ही रॅली पुणए शहरातील मुख्य रस्त्यांवरुन विविध कोथरुडला रवाना झाली. तेथेच रॅलीचा समारोप झाला.

भगत सिंह कोश्यारी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठी भाषेतून केली. सुरुवातीला त्यांनी 'तुळजाभवानी माता की जय' अशा घोषणा दिल्या. त्यानंतर 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा घोषणा दिल्या. या वेळी बोलताना राज्यपालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरुन कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देश-विदेशात ओळखले जाते. मला सायकल येत नाही. नाहीतर मिपण या रॅलीत सहभागी झालो असतो. असे, राज्यपाल म्हणाले. मी हळूहळू मराठी शिकत आहे. देशही पुढे जातो आहे. त्यामुळे लोक आपल्याकडे आदराने पाहात असतात, असे ते म्हणाले. (हेही वाचा, Governor and Controversy: विविध राज्यातील राज्यपाल आणि त्यांचे गाजलेले वाद, जे राजकीय वर्तुळात अनेकदा येतात चर्चेला)

रोज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा व्हिडिओ

पंतप्रधान मोदी यांनी योग दिवस सुरु केला. या योग दिनात घुंगट, बुरखा घेणाऱ्या महिलाही सहभागी होत आहेत. पर्यावरण रक्षणासाठी रॅलीचे आयोजन गरजेचे आहे. हिमालयात जाऊन केवळ आपले भारतीय लोकच साधना करु शकतात. ही रॅली केवळ आजच्या एका दिवसापूरती मर्यादित राहून नये. ती पुढेही सुरु ठेवावी असे राज्यपाल कोश्यारी म्हणाले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now