Mumbai-Pune Expressway Accident: खंडाळा घाटात भरधाव ट्रक झाला पलटी, सुदैवाने कोणीही गंभीर जखमी नाही

मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावर अपघाताची (Accident) मालिका सुरुच आहे. १७ ऑगस्ट रोजी एक भीषण अपघात झाला ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक्स्प्रेस वेच्या खंडाळा रस्त्यावर एक मोठा ट्रक पलटी झाला.

Mumbai-Pune Expressway Accident: खंडाळा घाटात भरधाव ट्रक झाला पलटी, सुदैवाने कोणीही गंभीर जखमी नाही
Mumbai Pune Express way Photo credit TWITTER

Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावर अपघाताची (Accident) मालिका सुरुच आहे. १७ ऑगस्ट रोजी एक भीषण अपघात झाला ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक्स्प्रेस वेच्या खंडाळा रस्त्यावर एक मोठा ट्रक पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणीही गंभीर जखमी झालेले नाही. (हेही वाचा-पोर्शे कार अपघात प्रकरण; अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार, 2 डॉक्टरांना अटक)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा बोरघाटातील अमृतांजन पुलावर ही घटना घडली. एक वेगवान ट्रक पलटी होऊन हा अपघात झाला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ट्रक चालकाला या अपघात किरकोळ दुखापत झाली. या अपघातात काही वेळ वाहतुक सेवा ठप्प झाली होती. (हेही वाचा- कसारा घाटात भीषण अपघात; वाहन दरीत कोसळल्याने 5 जणांचा मृत्यू)

सुदैवाने या अपघातात कोणतीही गंभीर घटना घडली नाही. अपघातात चालका दुखापत झाली. चालकाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर रस्त्यावर वाहतुक सेवा ठप्प झाली होती. ट्रक खंडाळा घाटातून जात होते. ट्रक अनियंत्रित झाल्याने ही घटना घडली.

(The above story first appeared on LatestLY on Aug 19, 2024 10:29 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).