मुंबई-पुणे एक्सप्रेसवर मालवाहू ट्रकची ट्रेलरला जोरदार धडक; 2 जणांचा जागीच मृत्यू
ही घटना आज सकाळी मुंबई-पुणे एक्सप्रेसवर (Mumbai-Pune Express) खपोली एक्झिटजवळ घडली.
पुण्याहून (Pune) मुंबईकडे (Mumbai) जाणाऱ्या मालवाहू ट्रकने ट्रेलरला धडक दिल्याने 2 जणांना जागीच जीव गमवावा लागला आहे. ही घटना आज सकाळी मुंबई-पुणे एक्सप्रेसवर (Mumbai-Pune Express) खपोली एक्झिटजवळ घडली. स्थानिक पोलिसांना या अपघाताची माहिती होताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिसांनी 2 जणांचे मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी जवळील रुग्णालयात पाठवले आहे. तसेच या अपघातातील जखमींवरही उपचार केले जात आहेत.
मुंबई- एक्सप्रेसवर नेहमी अशाप्रकारचे अपघात घडत असल्याच्या बातम्या आपल्या कानावर पडत असतात. यातच आज सकाळी पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या भरघाव मालवाहू ट्रकने ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. स्थानिकांनी या अपघाताची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच दोन्ही मृतदेह ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठव. तसेच या अपघातातील जखमींवरही उपचार सुरु करण्यात आले आहे. रम्यान, मुंबई- पुणे एक्सप्रेसवर वाहनांची काही वेळ गर्दी जमली होती. हे देखील वाचा- अहमदनगर: नगर-दौड महामार्गावर भीषण अपघात; भरधाव गाडीने दिली ट्रक ला धडक
सध्या पोलिस या अपघाताची चौकशी करत असल्याचे सांगण्यात आले आहे. हा अपघात घडल्यामागचे नेमके कारण काय? हे स्थानिक पोलीस शोधत आहे. तसेच या अपघाताची माहिती मिळवण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही देखील तपासण्यार येणार असल्याचे सांगितले जात आहे.