TRP Scam: अर्णब गोस्वामी यांनी मला 40 लाख रुपये आणि 12,000 अमेरिकी डॉलर्स दिले, पार्थो दासगुप्ता यांचा दावा- मीडिया रिपोर्ट

त्यानंतर हा प्रकार 2017 ते 2019 पर्यंत चालत राहिला त्यानंतर 2017 मध्ये अर्नब मला लोवर परेल ( मुंबई) येथील सेंट रेजिस हॉटेलमध्ये भेटला. त्यांनी फ्रान्स आणि सित्झरलँड येथे फॅमेली ट्रिपसाठी 6000 डॉलर दिले.

TRP Scam | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

टीआरपी घोटाळा (TRP Scam) प्रकरणात अटक झालेले ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च काउंसिल (BARC) इंडियाचे सीईओ पार्थो दासगुप्ता (Partho Dasgupta) यांनी मुंबई पोलिसांना (Mumbai Police) दिलेल्या हस्तलिखित जबाबाद खळबळजनक दावा केला आहे. अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांनी टीआरपी रेटिंग्ज आपल्या चॅनलच्या बाजूने वळविण्यासाठी तीन वर्षांत एकूण चाळीस लाख रुपये आपल्याला दिल्याचे आणि सुट्टी साजरी करण्यासाठी 12000 अमेरिकी डॉलर (भारतीय चलनात सुमारे 8,75,910 ) दिले होते, असे म्हटले आहे. टीआरपी घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांनी सादर केलेल्या अतिरिक्त आरोपपत्रात पुढे आली आहे.

इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसने पहिल्या पानावर याबाबतचे वृत्त दिले आहे. वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार सुमारे 3600 पानांच्या अतिरिक्त चार्जशीटमध्ये दासगुप्ता, ब्रॉडकास्ट ऑडिएन्स रीसर्च काउन्सील (BARC ) रोमिल रमगढिया आणि रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे सीईओ विकास खनचंदानी विरुद्ध एफआयआर दाखल केली आहे. या आधी नोव्हेंबर 2020 मध्ये पोलिसांनी जे आरोपपत्र दाखल केले होते त्यात 12 जणांची नावे होती. (हेही वाचा, TRP Scam: टीआरपी घोटाळयाप्रकरणी अर्णब गोस्वामी आणि रिपब्लिक टीव्हीविरूद्ध पुरावे मिळाले; मुंबई पोलिसांची उच्च न्यायालयात माहिती)

या आरोपपत्रात बार्कच्या फॉरेन्सीक ऑडिट रिपोर्ट, दासगुप्ता आणि गोस्वामी यांच्यात झालेल्या कथीत वॉट्सअॅप चॅट आणि 59 लोकांचे जबाब समाविष्ट आहेत. यात माजी काऊन्सीलर कर्मचारी आणि केबल ऑपरेटर्स यांचेही जबाब समाविष्ट आहेत.

आपल्या जबाबात दासगुप्ता यांनी म्हटले आहे की, मी अर्णब गोस्वामी यांना 2004 पासून ओळखतो. आम्ही टाइम्स नाऊमध्ये सोबत काम करत होतो. 2013 मध्ये सीईओपदावर मी BARC जॉईन केले. अर्नब गोस्वामी यांनी 2017 मध्ये रिपब्लिक लॉन्च केले. रिपब्लिक टीव्ही लॉन्च होण्यापूर्वीच त्यांनी मला रिपब्लिक लॉन्चिंगचा कार्यक्रम तयार असल्याबाबत सांगितले होते. तसेच, त्यांच्या टीव्ही चॅनलला चांगले रेटींग्ज देण्याबबतही अप्रत्यक्षपणे सूचवले होते. तशी थेट मदतही मागितली होती. गोस्वामी यांना चांगल्या पद्धतीने माहिती होत की टीआरपी सिस्टम कशा पद्धतीने काम करते. त्यांनी भविष्यात आपल्याला मदत करण्याचे अश्वासन दिले होते.

दरम्यान, अल्पावधीतच रिपब्लिक टीव्हीला पहिल्या क्रमांकाची रेटींग्ज मिळाली. त्यानंतर हा प्रकार 2017 ते 2019 पर्यंत चालत राहिला त्यानंतर 2017 मध्ये अर्नब मला लोवर परेल ( मुंबई) येथील सेंट रेजिस हॉटेलमध्ये भेटला. त्यांनी फ्रान्स आणि सित्झरलँड येथे फॅमेली ट्रिपसाठी 6000 डॉलर दिले. त्यानंतर 2019 मध्येही अर्नब मला त्याच हॉटेलमध्ये खासगी स्वरुपात भेटले. तेव्हा स्वीडन आणि डेन्मार्क येथील फॅमेली ट्रिपसाठी 6000 डॉलर दिले, असे पार्थोदासगुप्ता यांनी म्हटले आहे.

दरम्यान, दासगुप्ता यांच्या वकिलांनी हे आरोप नाकारले आहेत. दासगुप्ता यांच्या जबाबावर त्यांचे वकील अर्जुन सिंह यांनी इंडियन एक्सप्रेससोबत बोलताना म्हटले आहे की, आम्ही हे वक्तव्य आणि हा जबाब नाकारतो. कारण हा जबाब दबावात दिला असण्याची अधिक शक्यता आहे. कोर्टात याबाबत अधिक स्पष्टता येईल.