Traffic Advisory for Durga Idol Immersions: दुर्गा मूर्ती विसर्जनावेळी मुंबईमध्ये वाहतूक मार्गात बदल; पोलिसांनी जारी केले परिपत्रक
मूर्ती विसर्जनाच्या वेळी वाहतूक सुरळीत राहावी यासाठी पोलिसांनी जनतेला, या वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
मुंबई वाहतूक पोलिसांनी (Mumbai Traffic Police) शनिवारी नवीन वाहतूक निर्बंध आणि सूचना जारी केल्या, ज्यांची अंमलबजावणी मुंबई पोलिसांच्या कार्यक्षेत्रात दसरा आणि दुर्गा मूर्ती विसर्जनाच्या (Durga Idol Immersions) दिवशी म्हणजेच, 5 ते 6 ऑक्टोबर दरम्यान केली जाईल. या कालावधीत दक्षिण मुंबई आणि पूर्व उपनगरात एकूण 22 रस्ते बंद राहतील. दुसरीकडे, मुंबई शहरात यंदा दुर्गा देवीच्या विसर्जनादरम्यान पाण्यात तरंगणाऱ्या किंवा अर्ध्या बुडलेल्या दुर्गा देवीच्या मूर्तीचे फोटो काढता येत नाहीत किंवा व्हिडिओ बनवता येत नाहीत. या संदर्भात मुंबई पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
हे रस्ते बंद राहतील-
सरदार वल्लभभाई पटेल रोड गोल देऊळ ते गिरगाव चौपाटी
डॉ दादासाहेब बदकमकर मार्ग अलीभाई प्रेमजी जंक्शन ते त्रिवेणी चौक (ग्रँट रोड जंक्शन) पर्यंतच्या सर्व जंक्शनमध्ये
सीपी टँक सर्कल ते भालचंद्र कंपनीपर्यंत व्ही.पी रोड
ठाकूर द्वार ते ऑपेरा हाऊस जंक्शन पर्यंत JS.S रोड
पंडिता रमाबाई रोड
दत्ताराम लाड मार्ग (कालाचौकी जंक्शन ते श्रावण यशवंते चौक)
J.S.S मार्ग (श्यामलदास जंक्शन ते ठाकुरद्वार जंक्शन)
रानडे रोड (एनसी केळकर रोड ते चैत्यभूमी जंक्शन पर्यंत बंद)
वीर सावरकर मार्ग (सिद्धिविनायक जंक्शन ते येस बँक जंक्शनपर्यंत बंद)
केळुस्कर मार्ग, दक्षिण आणि उत्तर दोन्ही
दादरमधील M.B राऊत मार्ग
एसके बोले रोड (पोर्तुगीज चर्च ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत बंद)
एलजे रोड ते वीर सावरकर मार्ग दरम्यान, टाकनदास कटारिया रोड बेस्ट बसेससह पश्चिमेकडे जाणाऱ्या वाहनांसाठी बंद आहे
धारावीमध्ये सर्व संत रोहिदास मार्ग, 90 फूट रस्ता, 60 फूट रस्ता
माहीम सायन लिंक रोड (रहेजा ब्रिज)
पूर्व उपनगरातील हे रस्ते बंद राहतील-
मुलुंडमध्ये, दिनदयाल उपाध्याय मार्ग (डंपिंग ग्राउंड)
एव्हरेस्ट सिमेंट कंपनी रोड ते एनएस रोड जंक्शन बंद राहील
भांडुपमधील जंगल मंगल रोड (टेंभीपाडा रोड जंक्शन ते भट्टीपाडा रोड जंक्शन)
टाकी रोड भांडुप (L.B.S मार्ग जंक्शन ते जंगल मंगल रोड)
पश्चिम उपनगरात हे रस्ते बंद राहतील-
कांदिवली, केटी सोनी रोड (एचडीएफसी बँकेपासून कांदिवली गोठाण रोड)
'वन-वे' रहदारी मार्ग-
कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग साधू वासवानी मार्ग ते बधवार पार्क नाका
रामभाऊ साळगावकर मार्ग, शहिद भगतसिंग मार्ग ते नाथालाल पारेख मार्ग (पूर्व-दक्षिण)
नथाला पारेख मार्ग (बधवार पार्क जंक्शन ते इंदू क्लिनिक- कुलाबा पोस्ट ऑफिस पर्यंत)
पंडिता रमाबाई मार्ग (नाना चौक जंक्शन ते न्यायमूर्ती सीताराम पाटकर मार्ग)
केनेडी पूल (नाना चौक जंक्शन ते इस्ट बॉंड बंद राहील)
पठ्ठे बापूराव मार्ग (तारदेव सर्कल ते इस्ट बॉंड बंद राहील)
जावजी दादाजी मार्ग (तारदेव रोड- नाना चौक ते तारदेव सर्कलपर्यंत बंद)
बेलासिस पूल (मुंबई सेंट्रल ते तारदेव सर्कल पर्यंत बंद)
फ्रेंच ब्रिज (न्यायमूर्ती सीताराम पाटकर मार्गापासून ऑपेरा हाऊसपर्यंत बंद राहील)
काळबादेवी मार्ग रस्ता (तांबा काटा जंक्शन ते वर्धमान जंक्शन)
वीर सावरकर मार्ग
बाल गोविंदा दास रोड (जे.के. सावंत मार्गापासून ते एलजे रोडच्या जंक्शनपर्यंत वन-वे)
60 फूट रस्ता (कुंभारवाडा जंक्शन ते रॅम्प (उत्तरेकडे)
टीएच कटारिया रोड (गंगाविहार हॉटेल ते शोभा हॉटेल)
16) केटी सोनी रोड (एचडीएफसी बँक ते गौरव हाइट्स, न्यू लिंक रोड)
भंडारपाडा रोड (ज्ञानेश्वर विद्यालय ते शिवसेना सखा क्र. 21) (हेही वाचा: मुंबईत दुर्गा देवीच्या विसर्जनावेळी अर्ध्या बुडालेल्या किंवा तरंगत्या मुर्त्यांचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यावर बंदी; जाणून घ्या मार्गदर्शक तत्त्वे)
याशिवाय पोलिसांनी काही भागात पार्किंगबाबत निर्बंधही घातले आहेत. मूर्ती विसर्जनाच्या वेळी वाहतूक सुरळीत राहावी यासाठी पोलिसांनी जनतेला, या वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.