Akshaya Tritiya 2021 Gold Purchase: अक्षय्य तृतीये दिवशी सोनं खरेदी करताय? पहा विविध ज्वेलर्सच्या ऑनलाईन खरेदी साठीच्या ऑफर्स

यंदा 14 मे दिवशी अक्षय्य तृतीया आहे. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस असल्याने या दिवशी सोनं खरेदीसाठी विशेष लगबग असते.

Akshaya Tritiya 2021 Gold Purchase: अक्षय्य तृतीये दिवशी सोनं खरेदी करताय? पहा विविध ज्वेलर्सच्या ऑनलाईन खरेदी साठीच्या ऑफर्स
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Youtube)

हिंदू धर्मामध्ये साडेतीन मुहूर्तांना विशेष महत्त्व आहे. त्यापैकी एक अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya) यंदा 14 मे दिवशी आहे. या दिवशी सोनं खरेदीला विशेष महत्त्व असतं. दरम्यान भारतातील सध्याची कोरोना परिस्थिती पाहता अनेक शहरांमध्ये कडक लॉकडाऊन आहेत. त्यामुळे बाहेर पडून सोनं खरेदी करणं शक्य नसल्याने अनेक ज्वेलर्स कडून यंदा अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ऑनलाईन सोनं खरेदीचे (Online Gold Purchase) पर्याय देण्यात आले आहेत. मग यंदा तुमचा देखील सोनं खरेदीचा विचार असेल तर ही अक्षय्य तृतीयेची संधी दवडू नका. नक्की वाचा: Gold Purchase on Akshaya Tritiya: यंदा कोविड 19 च्या सावटाखाली सुरक्षित सोनं खरेदी करण्याचे ऑनलाईन पर्याय.

अक्षय्य तृतीया 2021 आणि ऑनलाईन ऑफर्स

  • टाटाच्या तनिष्क कडून अक्षय्य तृतीयेला ऑनलाईन खरेदी दरम्यान सोनं आणि डायमंड ज्वेलरीच्या घडणावळीवर 25% सूट आहे.
  • कल्याण ज्वेलर्सने देखील अक्षय तृतीयेनिमित्त 15 हजारांवरील किंमतीच्या दागिन्यांची खरेदी आणि कार्ड पेमेंट केल्यास 5% सूट जाहीर केली आहे.
  • वामन हरी पेठे ज्वेलर्स कडूनही सध्या डायमंड ज्वेलरीच्या घडणावळीवर 50% पर्यंत सूट दिली जात आहे.
  • जोयालूसका मध्ये 16 मे पर्यंत 50 हजारांच्या सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर 22 कॅरेट सोन्याचं 200 एमजी चं कॉईन मोफत दिलं जाणार आहे. हीच ऑफर डायमंड वर देखील आहे. तर एसबीआय च्या ग्राहकांना 5% कॅशबॅक ऑफर आहे. (नक्की वाचा: Akshay Tritiya 2021: अक्षय तृतीयेच्या दिवशी 'या' शुभ मुहूर्तावर खरेदी करा सोनं; जाणून घ्या सविस्तर).

दरम्यान आज अक्षय्य तृतीयेच्या आदल्या दिवशी महाराष्ट्रात 24 कॅरेट सोन्याचा दर ₹45,720 आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर ₹44,720 रूपये आहे. तर चांदी प्रतिकिलो ₹71,130 इतकी आहे.

(The above story first appeared on LatestLY on May 13, 2021 11:24 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).