Tomato Price: टोमॅटोच्या किंमतीत घसरण झाल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा
टोमॅटोचे भाव निम्म्याने कमी झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
राज्यासह देशात टोमॅटोच्या किंमती (Tomato Price) या दोनशेच्या घरात गेल्याने अनेक सर्वसामान्यांच्या घरातून टोमॅटो हा गायब झाला होता. गेल्या 2 महिन्यापासून वाढत असलेल्या टोमॅटोच्या दरात वाढ झाल्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना आता एक दिलासादायक बातमी आहे. देशात आणि राज्यात आता टोमॅटोचे भाव हळूहळू कमी होताना दिसत आहेत. राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची आवक वाढल्यामुळे मागील तीन-चार दिवसांपासून किरकोळ बाजारात दर कमी झाले आहेत. (हेही वाचा - Sanjay Raut On Priyanka Gandhi: प्रियांका गांधी वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध लढल्या तर निश्चित विजयी होतील; संजय राऊत यांचा दावा)
गेल्या महिन्यात टोमॅटोचे दर हे 200 रुपयांपर्यंत गेले होते. आता या किंमती कमी होत असून घाऊक बाजारातील दर आता 70 ते 85 रुपयांवर उतरले आहेत. पुण्याच्या नारायणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील टोमॅटोचे भाव कमी झाले आहेत. टोमॅटोचे भाव निम्म्याने कमी झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. नव्याने लागवड केलेला टोमॅटो मार्केटमध्ये आल्याने क्रेट मागे 50 टक्के घट झाली आहे.
आज राज्यातील विविध बाजारपेठमध्ये विक्रिला पाठवला आहे. तेथे निम्म्याने दर कमी झाल्याने हा सगळा तोटा व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे.