Palghar: विरार येथील गृहनिर्माण संकुलात चिमुकल्याचा कारने चिरडून मृत्यू; कार चालकावर गुन्हा दाखल

या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून मुलाच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Palghar: विरार येथील गृहनिर्माण संकुलात चिमुकल्याचा कारने चिरडून मृत्यू; कार चालकावर गुन्हा दाखल
Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

Palghar: पालघर जिल्ह्यातील एका गृहनिर्माण संकुलात एका अडीच वर्षांच्या मुलाचा कारने चिरडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी शनिवारी पीटीआय या वृत्तसंस्थेला यासंदर्भात माहिती दिली. गुरुवारी रात्री उशिरा जिल्ह्यातील विरार शहरात ही घटना घडली. इमारतीतील सुरक्षा रक्षकाचा मुलगा मनीष ढकल हा आवारात खेळत असताना एक रहिवासी त्याची कार बाहेर काढत होता. वाहन चिमुकल्यावर आले आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, कलम 304(अ) (रॅश किंवा निष्काळजीपणाने मृत्यू), 279 (रॅश ड्रायव्हिंग) आणि भारतीय दंड संहिता आणि मोटार वाहन कायद्यातील इतर संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप चालकाला अटक करण्यात आलेली नाही. (हेही वाचा -Pune Shocker: पालकांमधील सततच्या वादाला कंटाळून 15 वर्षीय मुलाची चालत्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या)

या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून मुलाच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

तथापी, आज ठाण्यात 56 वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीला गोळ्या घालून ठार केले. परंतु त्यानंतर लगेचच हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. कळव्यातील कुंभार अली येथील यशवंत निवास इमारतीत शुक्रवारी रात्री 10.15 च्या सुमारास ही घटना घडली. दिलीप साळवी आणि त्यांची 51 वर्षीय पत्नी प्रमिला अशी मृतांची नावे आहेत.

एका पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, शुक्रवारी रात्री साळवी घरी परतल्यानंतर लगेचच त्यांच्यात आणि त्यांच्या पत्नीमध्ये बाचाबाची झाली. रागाच्या भरात त्यांनी रिव्हॉल्व्हर काढून पत्नीवर दोन गोळ्या झाडल्या, यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर साळवी यांचा हृदयरोगाचा झटका आल्याने मृत्यू झाला.

(The above story first appeared on LatestLY on Sep 02, 2023 03:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).