Coronavirus: धारावीत आज 38 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1621 वर पोहोचली

त्यामुळे धारावीतील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1621 वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत 60 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) माहिती दिली आहे.

Dharavi slums in Mumbai. (Photo Credit: PTI)

Coronavirus: धारावीत (Dharavi) आज 38 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे धारावीतील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1621 वर पोहोचली आहे. तसेच धारावीत आतापर्यंत 60 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) माहिती दिली आहे.

दरम्यान, मुंबई मध्ये दररोज कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. सोमवारी मुंबईत 1430 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 38 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या 31,789 वर पोहोचली आहे. तर 1026 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (हेही वाचा - सांगली-कोल्हापूर महापूर पूनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाला सूचना; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आपत्ती व्यवस्थापनाचा मान्सूनपूर्व आढावा)

याशिवाय राज्यात काल 2436 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 60 जणांचा कोरोनामुळे बळी गेला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 52,667 वर पोहोचला आहे. राज्यात आतापर्यंत 1695 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. दरम्यान भारतात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1,45,380 वर पोहोचली आहे.