Nanded Shocker : टिप्पर आणि रिक्षाचा भीषण अपघात; 1 ठार, 7 गंभीर जखमी
तेलंगणा राज्यातून नांदेड एक रिक्षा जात होती. रिक्षाला टिप्परने जोरदार धडक दिली. यात रिक्षात असलेल्या एकाचा मृत्यू झाला.
Nanded Shocker: नांदेडच्या धर्माबाद बिद्राळी रोडवर भीषण अपघात झाला. तेलंगणा राज्यातून नांदेड एक रिक्षा जात होती. रिक्षाला टिप्परने जोरदार धडक (Tipper and Rickshaw Accident)दिली. यात रिक्षात असलेल्या एकाचा मृत्यू झाला. तर, 7 गंभीर जखमी आहेत. 5 शेळ्यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. जखमींना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात कसा झाला त्याची माहिती समोर आलेली नाही. पोलिस घटनेचा तपास करत आहे. दरम्यान, 5 शेळ्यांचा मृत्यू झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झले आहे. (हेही वाचा:Pune Shocker: वाहतूक पोलीस अधिकाऱ्यास अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, पुणे येथील धक्कादायक प्रकार; आरोपीस अटक )
अपघातात सात जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. तर अपघातात पाच शेळ्या देखील जागीच ठार झाल्याची माहिती आहे. तेलंगणा राज्यातून शेळ्या घेऊन येणाऱ्या ऑटो रिक्षाला टिप्परने धडक दिल्यानंतर ही दुर्घटना घडली आहे.