डोंबिवली: कोपर रेल्वे स्थानकात TC ला मारहाण करणारा प्रवासी अटकेत

टीसीने तिकीट विचारल्यानंतर टीसीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना मध्य रेल्वेच्या डोंबिवली येथील कोपर रेल्वे स्थानकात घडली आहे.

Representational Image (Photo Credit: ANI)

टीसीने तिकीट विचारल्यानंतर टीसीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना मध्य रेल्वेच्या डोंबिवली (Dombivali) येथील कोपर रेल्वे स्थानकात (Kopar Railway Station) घडली आहे. या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी प्रवाशाला अटक केली आहे. किशन परमार (20) असे या प्रवाशाचे नाव आहे.

एका वृत्तवाहिनीनी दिलेल्या वृत्तानुसार, आज सकाळी कोपर रेल्वे स्थानकात जानू साळवी नावाचे टीसी तिकीट तपासण्याचे काम करत होते. त्यावेळी किशन परमार यांना त्याने तिकीट विचारले. त्याच्यावरुन दोघांत वाद झाला आणि त्याने टीसीला मारहाण करायला सुरुवात केली.

यावेळी रेल्वे पोलिसांनी किशन परमार याला ताब्यात घेऊन त्याच्यावर मारहाण आणि सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल डोंबिवली रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी किशन परमार याला अटक करण्यात आली आहे.

मात्र टीसीने आपल्या मुलाला मारहाण केल्याचे किशन परमार यांच्या वडीलांचे म्हणणे आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिस अधिक तपास करत आहेत.