Nagpur Car Accident: कारच्या धडकेत तीन वर्षाच्या मुलासह दोन जखमी, तिघांना अटक, संतप्त जमावाने फोडल्या काचा (Watch Video)
या अपघातात एका लहान मुलासह तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Nagpur Car Accident: नागपुर जिल्ह्यातील कोतवाली पोलिस हद्दीतील झेंडा चौकात शुक्रवारी सांयकाळी अपघात झाला. या अपघातात एका लहान मुलासह तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. भरधाव कारने धडक दिल्याने हा अपघात घडून आल्याचा प्रत्यक्षदर्शिनी सांगितले. या घटनेनंतर पोलिसांनी बेदरकारपणे गाडी चालवणाऱ्यावर गुन्हा दाखल केला तर कार चालकासह तिघांना अटक करण्यात आले आहे. (हेही वाचा- एमिटी युनिव्हर्सिटीजवळ थार सोबत स्टंट करणं पडलं महागात, व्हिडिओ व्हायरल होताच तरुणाला अटक
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री कारने धडक दिल्याने एका लहान मुलासह तीन जण जखमी झाले. हा अपघात साडेआठच्या सुमारास घडला. जखमी झालेल्यांना तात्काळ वैद्यकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कार बेदरकारपणे चालवत असल्याने हा अपघात घडून आला. अपघातानंतर रस्त्यावर बराच वेळ गोंधळची परिस्थिती निर्माण झाली. अपघातानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपींच्या कारमधून दारूच्या बाटल्या आणि अमली पदार्थ जप्त केले. पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
जखमींमध्ये तीन वर्षाचे बालक, एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. जखमींना शासकिय रुग्णालयात दाखल केले आहे. जखमींवर उपचार सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. अपघातानंतर जमावांनी कार चालकाला पकडून ठेवले होते. एवढं नाही तर अपघाताच्या घटनेनंतर जमावाने कारची तोडफोड केली. कारच्या काच्या दगडाने फोडल्या. कारच्या काच्या तोडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आहे. पोलिसांनी कार चालकासह तिघांना अटक केले आहे. कार चालकासह तिघांचा अल्कोहोल तपासणी करण्यात येणार असल्याचे डीसीप गोराख भारमे यांनी माहिती दिली. अपघातानंतर रस्त्यावर बराच वेळ खळबळ उडाली होती.