Sanjay Raut On Uorfi Jawed: महाराष्ट्राच्या राजकारणात उर्फी जावेदच्या कपड्यांशिवाय कोणताचं मुद्दा राहिला नाही: संजय राऊत यांचा सामनामधून भाजपवर निशाणा
पक्षाचे मुखपत्र सामनाच्या 'रोकटोक' या साप्ताहिक स्तंभात संजय राऊत यांनी लिहिले आहे की, महाराष्ट्राचे राजकारण इतके टोकाला गेले आहे की आता उर्फी जावेदच्या कपड्यांशिवाय दुसरा मुद्दाच उरला नाही.
Sanjay Raut On Uorfi Jawed: उर्फी जावेद (Uorfi Javed) नेहमीच चर्चेत असते. ड्रेसिंग सेन्ससाठी प्रसिद्ध असलेली उर्फी आणि भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. त्याचवेळी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या सर्व वादावर भाष्य केले आहे. ऊर्फी जावेदच्या निमित्ताने राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
संजय राऊत म्हणाले की, जोपर्यंत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ऊर्फीच्या शॉर्ट कपड्यांविरोधात जाहीरपणे तक्रार केली नव्हती तोपर्यंत तिला कोणीही ओळखत नव्हते. पक्षाचे मुखपत्र सामनाच्या 'रोकटोक' या साप्ताहिक स्तंभात संजय राऊत यांनी लिहिले आहे की, महाराष्ट्राचे राजकारण इतके टोकाला गेले आहे की आता उर्फी जावेदच्या कपड्यांशिवाय दुसरा मुद्दाच उरला नाही. (हेही वाचा - Urfi Javed: अभिनेत्री उर्फी जावेद प्रकरणी पापाराझी जबाबदार? मुंबई पोलिसांनी बजावलेल्या नोटिशीनंतर उर्फीने नोंदवला जबाब)
संजय राऊत यांनी आपल्या संपादकीयमध्ये लिहिले आहे की, संस्कृतीच्या नावाखाली भाजपचे उर्फी जावेदचे मॉरल पोलिसिंग टाळता आले असते. याचबरोबर उर्फी जावेद प्रकरणाचा शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या आगामी पठाण चित्रपटाशी संबंध जोडत राऊत म्हणाले, "दीपिका पदुकोणविरुद्धचा राग फक्त तिच्या भगव्या बिकिनीसाठी होता का? भगव्या कपड्यात भाजपचे अनेक नेते अनेक अशोभनीय कृत्य करतात.
संजय राऊत पुढे म्हणाले की, हरियाणाचे मंत्री संदीप सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप झाले. तेव्हा भाजप नेत्याने फक्त उर्फी जावेदच्या मुद्द्यावर आवाज उठवला. चित्रा वाघ यांच्या तक्रारीनंतर उर्फी जावेदने भाजप नेत्याविरोधात तक्रार केली होती. वाघ यांच्याविरुद्ध अभिनेत्रीला सार्वजनिक ठिकाणी इजा करण्याची धमकी देणे, गुन्हेगारी धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा - Urfi Javed: सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन केल्याप्रकरणी उर्फी जावेदला नोटीस; मुंबई पोलिसांनी घेतली चित्रा वाघ यांच्या तक्रारीची दखल)
4 जानेवारी रोजी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरच्या माध्यमातून उर्फी जावेदवर निशाणा साधला होता. त्यांनी जावेदच्या ड्रेसिंग सेन्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत महिला आयोग त्यासाठी काही करणार की नाही, असा सवाल केला होता. वाघ यांनी ट्विटरवर लिहिले आहे की, "एक अर्धनग्न महिला रस्त्यावर बिनधास्तपणे फिरते. खुद्द महिला आयोगच याकडे का लक्ष देत नाही? हा विरोध उर्फीच्या विरोधात नाही, तर सार्वजनिक ठिकाणी मोकळेपणाने फिरण्याच्या वृत्तीविरोधात आहे. आयोग काही करेल.. हो की नाही..?"
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)