Dr. Sheetal Amte Suicide: डॉ. शीतल आमटे यांच्या कामांना, विचारांना न्याय मिळाला पाहिजे; शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांचे वक्तव्य

बाबा आमटे यांची नात डॉक्टर शीतल आमटे (Sheetal Amte) यांनी आज आत्महत्या (Suicide) केली आहे. डॉ. शितल यांच्या मृत्युनंतर राजकीय विश्वातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

Nilam Gorhe, Sheetal Amte (Photo Credit: Facebook)

महारोगी सेवा समितीच्या सीईओ, ज्येष्ठ समाजसेवक स्व. बाबा आमटे यांची नात डॉक्टर शीतल आमटे (Sheetal Amte) यांनी आज आत्महत्या (Suicide) केली आहे. डॉ. शितल यांच्या मृत्युनंतर राजकीय विश्वातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. दरम्यान, शिवसेना (Shiv Sena) प्रवक्त्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनीदेखील शीतल आमटे यांच्या जाण्यावर शोक व्यक्त केला आहे. शीतल आमटे करजगी यांचे आज अत्यंत धक्कादायक, असे निधन झाले. त्यांचा आणि माझा गेले काही महिने परिचय अधिक चांगल्या प्रकारे झाला होता. 25 नोव्हेंबर 2020 ला माझे आणि त्यांचे बोलणे झाले होते. तेच आमचे शेवटचे बोलणे ठरले, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत.

"शीतल यांच्या निधनाने एक अतिशय उमदे असे नेतृत्व आपण गमावलेले आहे. त्यांनी ज्या प्रकारे कुष्ठ रोग्याची सेवा केली, त्याचे व्हीडिओसुद्धा त्यांनी मला बघण्यासाठी पाठवले होते. अत्यंत कष्ट घेऊन त्या सगळे ते काम दुरुस्त करण्याचे प्रयत्न करत होत्या. त्यांना काही सरकारच्याकडून राहिलेल्या प्रकल्पांबद्दल त्यांना काही सहकार्य पाहिजे होती, त्या बद्दलसुद्धा मी त्यांना सांगितले होते. की तुम्ही मला तसे पत्र द्या जेणेकरून त्या त्या विभागाच्या तर्फे पाठपुरावा करायला मदत करते अशी मी ग्वाही दिली होती व शीतल यांनी आभार ही कळवले होते. शीतलच्या अशा अचानक धक्कादायक आणि ज्या प्रकारे निधन झाल्याचे कळले, त्याचा मला फार मोठा धक्का बसला आहे. तसेच त्यांच्या कामांना आणि विचारांना न्याय मिळाला पाहिजे, असेही नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- Dr. Sheetal Amte Suicide: डॉ. शीतल आमटे यांच्या मृत्युनंतर सुप्रिया सुळे, नितीन राऊत, अतुल भातखळकर, रक्षा खडसे, रोहित पवार यांनी दिल्या 'अशा' प्रतिक्रिया

शीतल आमटे या सध्या आनंदवनची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या. मात्र, शीतल या गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात असल्याचे काही दिवसांपूर्वीच त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले होते. दरम्यान, आज शीतल आमटे यांनी विषाचे इंजेक्शन घेतले, हे विष घेतल्यावर त्यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. होते. मात्र, रुग्णालयात पोहचताच तिथे उपस्थित वैद्यकीय अधिकार्‍यांनी डॉ. शीतल यांचा मृत्यु झाल्याचे घोषित केले.

शीतल आमटे या डॉक्टर, अपंगत्व विशेषज्ज्ञ आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या होत्या. बाबा आमटे यांचे सुपुत्र डॉ. विकास आमटे आणि डॉ. भारती आमटे यांची त्या कन्या आहेत. बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या सेवाकार्याने वेगळी ओळख निर्माण केलेल्या महारोगी सेवा समितीच्या त्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या.