Ahmednagar murder: दीड लाखाची सुपारी देऊन पतीची हत्या, आरोपी पत्नी आणि प्रियकराला अटक, अहमदनगर येथील घटना

अहमदनगर येथे एका पत्नीने प्रियकरासाठी आपल्या पतीची हत्या सुपारी देऊन हत्या केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

हल्ला | प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

Ahmednagar murder: अहमदनगर येथे एका पत्नीने प्रियकरासाठी आपल्या पतीची हत्या सुपारी देऊन हत्या केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हत्येची माहिती मिळताच, गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी पत्नी, तिच्या प्रियकरासह पुण्यातून पाच आरोपींना अटक केले आहे. दरम्यान पत्नीनेच या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यामुळे या घटनेमुळे पोलिसही चक्रावले आहे. (हेही वाचा- महाराष्ट्रात गँगवॉर, भाजपला सत्तेची मस्ती', )

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा तालुक्यातील कोथुळ येथए योगेश सुभाष शेळके या तरुणाच्या खुन झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी या घटनेची चौकशी करत खूनाचा गुढ रहस्य उलगडा केला. आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराने योगेशच्या खूनाचा कट रचला होता ही माहिती पोलिसांच्या हाती लागली.  योगेशला आपल्या पत्नीचे दुसऱ्या तरुणाशी प्रेमसंबंध असल्याचा संशय आला होता. त्यामुळे रोज दोघांमध्ये भांडण होत असे. योगेश पत्नीला मारहाण देखील करत असे, यालाच कंटाळून पत्नीने आणि तिच्या प्रियकराने योगेशला संपवून टाकण्याचा प्लान केला.

पतीला मारून टाकण्यासाठी तीने प्रियकराला दीड लाख रुपये दिले होते. प्रियकराने योगेशला संपवून टाकण्यासाठी पुण्यातील चार लोकांना सुपारी दिली. मंगळवारी पहाटे कोथून येथे प्रियकरासोबत चारही हल्लेखोर निघाले. योगेशच्या घरी गेले आणि त्याच्या धारदार शस्त्राने वार करत त्याचा खून केला. पोलिसांना हत्येची माहिती मिळताच आरोपी पत्नी, प्रियकर रोहित साहेबराव लाटे, अनिश सुरेंद्र धडे याच्यासह आणखी काही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif