चंद्रपुर जिल्ह्यातील बचतगटांची उत्पादने आता Amazon वर उपलब्ध होणार; विजय वडेट्टीवार यांची माहिती
जिल्हातील उमेद समुहांची उत्पादने आता 'ॲमेझॉन' वर उपलब्ध होणार आहेत. बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते हे उत्पादन वेबसाईटवर प्रदर्शित करण्यात आले. यासंदर्भात वडेट्टीवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे.
गावपातळीवर आपल्या गुणकौशल्यातून विविध नाविण्यपुर्ण उत्पादने निर्माण करणाऱ्या उमेद स्वयंसहायता समुहांना जागतिक बाजारपेठ मिळविण्याच्या दृष्टीने चंद्रपूर जिल्ह्याने महत्वाचे पाउल टाकले आहे. जिल्हातील उमेद समुहांची उत्पादने आता 'ॲमेझॉन' वर (Amazon) उपलब्ध होणार आहेत. बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार (Vijay wadettiwar) यांच्या हस्ते हे उत्पादन वेबसाईटवर प्रदर्शित करण्यात आले. यासंदर्भात वडेट्टीवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे.
चंद्रपूर जिल्हयात सुमारे 7200 समुह आहे. या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर 860 ग्रामसंघाची स्थापना करण्यात आली आहे. तर 34 प्रभागसंघ तयार झाले आहेत. या अभियानाच्या माध्यमातून सुमारे 1 लाख 80 हजार कुटूंबे आपल्या विविध आर्थिक गरजा भागवत आहेत, असंही विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. (हेही वाचा - गतवर्षी खड्डयांसोबत सेल्फी काढणारी राष्ट्रवादी यावर्षी मुंबई-गोवा महामार्गावर 'स्तुत्य उपक्रम' का राबत नाही? आशिष शेलार यांचा सवाल)
दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात नागरिकांनी विविध उत्पादन सुरू केली आहेत. यात कलाकुसरीच्या वस्तू , खाद्य उत्पादने, काष्ठ शिल्प, वनऔषधी आदींचा समावेश आहे. या वस्तूच्या विक्रीतून नागरिकांना मोठी आर्थिक मदत होणारा आहे. या वस्तूंना जागतिक बाजारपेठ मिळाली आहे. त्यामुळे या वस्तू आता जागतिक पातळीवर मिळणं शक्य होणार आहे.