हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कर्करोगासारख्या दीर्घ आजारांवरील औषधांच्या किंमती होणार कमी
त्यामुळे सामान्य रुग्णांना स्वस्तात औषधे मिळणार आहेत.
प्रदूषित वातावरण आणि धकाधकीचे जीवन यामुळे आज लोकांमध्ये हृदयरोग (Heart Disease), मधुमेह (Diabetic), उच्च रक्तदाब (High Blood Pressure) आणि कर्करोग (Cancer) यांसारखे आजार अगदी प्रकर्षाने पाहायला मिळतात. या आजारांवरील औषधे इतकी महागडी असतात त्याच्या खर्चाचा ताण अख्ख्या कुटूंबावर पडतो. अनेकदा अख्खे कुटूंब उद्ध्वस्त होते. या पार्श्वभूमीवर सरकारने औषध कंपन्यांच्या मनमानी कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यावश्यक १ हजार ३२ औषधांच्या किमती निश्चित केल्या आहेत. त्यामुळे सामान्य रुग्णांना स्वस्तात औषधे मिळणार आहेत.
जनऔषधी स्टोअर्सना ७०० विविध प्रकारची औषधेही पुरवली जाणार आहेत. जेनेरिक औषध दुकानांच्या माध्यमातून सामान्य रुग्णांना अत्यल्प दरात औषध पुरवठा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याचा फायदा गरीब रुग्णांना नक्कीच होईल.
कर्करोग आणि इतर आजारासंबंधीच्या ४२ औषधांचे व्यापारी मार्जिन निश्चित केल्याने औषधांच्या किमती ९० टक्क्यांपर्यंत कमी होणार आहेत. त्याचा फायदा दीर्घकाळ औषधे घेणाऱ्या रुग्णांना होणार आहे.
हेही वाचा- कॅन्सर आणि दुर्मिळ आजारांवरील औषधे होणार स्वस्त? केंद्र सरकारचे मोठे पाऊल
मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, कर्करोग अशा आजारांवर नियमित आणि दीर्घकालीन औषधे घ्यावी लागतात. त्यामुळे जेनेरिक औषधे उपलब्ध झाल्यास रुग्णावरील आर्थिक ताण कमी होणार आहे. शहरात सध्या २५ जेनेरिक औषध दुकाने आहेत. रुग्णांचाही प्रतिसाद चांगला आहे.