मंत्रिपद हे फक्त नाचण्यासाठी नसते; हर्षवर्धन पाटील यांचा दत्तात्रय भरणेंना टोला
'मंत्रिपद हे फक्त नाचण्यासाठी नसते, लोकांची कामे करण्यासाठी असते,' असा टोला त्यांनी दत्तात्रय भरणे यांना लगावला आहे.
राजकारण म्हटलं की एकमेकांवर टिका करणे हे ओघाओघाने आलेच. अलीकडेच भाजप पक्षात प्रवेश केलेल्या हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नेते दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांच्यावर टिका केली आहे. 'मंत्रिपद हे फक्त नाचण्यासाठी नसते, लोकांची कामे करण्यासाठी असते,' असा टोला त्यांनी दत्तात्रय भरणे यांना लगावला आहे. आम्ही बघतोय किती कामं होत आहेत. 14 कोटी जनतेपैकी 40 ते 42 लोकांना मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळते. त्याचा उपयोग लोकांच्या हितासाठी करायचा असतो. दुर्दैवाने सध्याच्या सरकारमध्ये तशी लोकं दिसत नाहीत, अशी टीका हर्षवर्धन पाटील यांनी केली. ते रविवारी इंदापूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरात प्रसारमाध्यमांशी बोलत असताना दत्तात्रय भरणे यांच्यावर जोरदार टिका केली."मंत्रिपद हे मिरवण्याची गोष्ट नाही त्याचा उपयोग आपल्या भागातील लोकांना तसेच सर्वसामान्य माणसांना किती होतो? हा खरा महत्त्वाचा विषय आहे. मी खोटं-नाट वैगरे अजिबात करणार नाही. जे काही करेल ते प्रामाणिकपणे तुम्हा सर्वसामान्यांसाठी करेन" असे दत्तात्रय भरणे यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या भाषणात सांगितले होते. त्यावर हर्षवर्धन पाटील यांनी टिका करत भरणेंचा खरपूस समाचार घेतला.हेदेखील वाचा- 'माझा फोन टॅप होत असल्याचा दाट संशय'; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट
दरम्यान पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरही त्यांनी भाष्य केले. "सरकार चालवताना नैतिकता लागते. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणातील तथ्य ऑडिओ क्लीप्सच्या माध्यमातून बाहेर आले आहे. त्यामुळे दोषींवर कारवाई व्हायला पाहिजे. सार्वजनिक जीवनात काम करताना नैतिक मूल्य सांभाळून काम करावं लागतं. ते सध्या होताना दिसत नाही. अशी किती प्रकरणे झाल्यावर सरकारला जाग येईल" असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)