राज्यातील विविध जिल्ह्यांत अडकलेल्या लोकांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी शासनाकडून 10 हजार एसटी बसेसमार्फत मोफत सेवा पुरवण्यात येणार - विजय वडेट्टीवार
याबाबत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माहिती दिली आहे.
लॉकडाऊनमुळे (Lockdown) राज्यातील विविध जिल्ह्यांत अडकलेल्या लोकांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी शासनाकडून 10 हजार एसटी बसेसमार्फत मोफत सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी माहिती दिली आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांत अडकलेल्या लोकांना पुढील 4 दिवसांत त्यांच्या गावी सोडण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून 10 हजार एसटी बसेसमार्फत मोफत सेवा पुरवण्यात येणार आहे. यासाठी मदत व पुनर्वसन विभागाकडून एसटी महामंडळाला आवश्यक निधी देण्यात येणार असल्याचही विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. (हेही वाचा - दारूच्या दुकानांसमोर रांगा लावणाऱ्या सर्वांची रेशन कार्ड रद्द करा; खासदार इम्तियाज जलील यांची राज्य सरकारकडे मागणी)
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आतापर्यंत 3 वेळा लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. या लॉकडाऊनमध्ये विविध राज्यात तसेच जिल्ह्यात मजूर, विद्यार्थी अडकून पडले आहेत. या सर्वांना आप-आपल्या घरी पोहोचण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या 15 हजार पेक्षा जास्त झाली आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना रुग्णांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.