देशातील पहिली 'इंटरसिटी इलेक्ट्रिक बस' धावणार मुंबई-पुणे महामार्गावर

त्यानुसार, देशातील पहिली 'इंटरसिटी इलेक्ट्रिक बस' (Intercity Electric Bus) महाराष्ट्रातील मुंबई-पुणे महामार्गावर (Mumbai-Pune Highway) धावणार आहे. राज्यात सध्या 2 इलेक्ट्रिक बस सुरु करण्यात आल्या असून या बसचं उद्धाटन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

Intercity Electric Bus

राज्य परिवहन महामंडळ (State Transport Corporation) येत्या काही महिन्यात राज्यातील महत्त्वाच्या रस्त्यांवर इलेक्ट्रिक बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, देशातील पहिली 'इंटरसिटी इलेक्ट्रिक बस' (Intercity Electric Bus) महाराष्ट्रातील मुंबई-पुणे महामार्गावर (Mumbai-Pune Highway) धावणार आहे. राज्यात सध्या 2 इलेक्ट्रिक बस सुरु करण्यात आल्या असून या बसचं उद्धाटन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

या इलेक्ट्रिक बसमध्ये 45 आसने असून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी 4 सीसीटीव्ही कॅमरे बसवण्यात आले आहेत. तसेच प्रवाशांच्या मनोरंजासाठी एक टीव्ही स्क्रीनदेखील असणार आहे. वाताणुकूलीत असलेल्या या बसमध्ये जीपीएस ट्रॅकरही बसवण्यात आलं आहे. (हेही वाचा - 'मुंबई बाग' निशेध आंदोलनाचे आयोजक फिरोज मीठीबोरवाला यांच्यासह अली भोजानी यांना मुंबई पोलिसांची नोटीस)

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही बस अत्यंत लाभदायी ठरणार आहे. प्रवाशांना मुंबई-पुणे प्रवास करण्यासाठी केवळ 450 ते 500 रुपये मोजावे लागणार आहेत. या बसमुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही. राज्य परिवहन महामंडळाने राज्यात गेल्या 5 वर्षांपासून शिवशाही बस सुरू केली होती. या बसला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर एसटी महामंडळाने 'शिवाई' नावाची नवीन इलेक्ट्रिक बस घेण्याचा निर्णय घेतला. या बसमुळे एसटी महामंडळाच्या डिझेलच्या खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.