महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे विभाजन होणे शक्य नाही' उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्पष्टीकरण

यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी जिल्हा विभाजनाबाबत वक्तव्य करुन सर्वांचे लक्ष आकर्षित करून घेतले आहे.

Ajit Pawar | (Photo Credits: Facebook)

लातूर ( Latur) जिल्ह्यातून उदगिर (Udgir) जिल्हा वेगळा करण्यासाठी प्रशासकीय हालचाली सुरु झाल्यानंतर राज्यभरात जिल्हा विभाजनाच्या चर्चांनी अधिक जोर धरला होता. यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी जिल्हा विभाजनाबाबत वक्तव्य करुन सर्वांचे लक्ष आकर्षित करून घेतले आहे. जिल्हा विभाजनाच्या चर्चेत कुठलही तथ्थ नसून अर्थिक स्थिती पाहता जिल्ह्यांचे विभाजन शक्य नाही असे अजित पवार म्हणाले आहे. राज्यात 28 नवे जिल्हे होणार, हे कुणी सांगितले आणि कधी चर्चा झाली असा प्रश्नही त्यांनी त्यावेळी उपस्थित केला आहे.

नुकतीच औरंगाबाद येथे अजित पवार यांनी विभागीय आयुक्त कार्यलयात बैठक पार पडली. त्यावेळी महाराष्ट्रातील जिल्हा विभाजनासंदर्भातील प्रश्नावर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. महाराष्ट्रातील काही भागातून जिल्हा विभाजनाच्या मागण्या केल्या जात आहे, मात्र, एक जिल्हा अस्तित्वात आणण्यासाठी राज्य सरकारला तब्बल 750 कोटी रुपये खर्च करावा लागेल. कुणाच्या मनात कोणतीही कल्पना येते आणि ते लोक सरकारसमोर मांडतात, असे अजित पवार म्हणाले आहेत. तसेच वेगवेगळ्या भागातून जिल्हा निर्मितीच्या मागण्या येत राहतात. परंतु, अर्थिक परिस्थिती पाहून पुढील निर्णय घ्यावे लागतात, असेही अजित पवार म्हणाले आहेत. हे देखील वाचा- कोल्हापूर महापलिकेच्या सभागृहात भाजपचे कमलाकार भोपळे यांनी घेतले काँग्रेस नगरसेवक शारंगधर देशमुख यांचे चुंबन

जिल्हा विभाजनासाठी राज्याच्या इतर भागातून मोठी मागणी केली जात आहे. बीडमधून अंबाजोगाई, नाशिकमधून मालेगाव, चंद्रपूरमधून चिमूर-ब्रह्मपुरी आणि नगरमधून श्रीरामपूर जिल्हा निर्मिताची मागणी होताना दिसत आहे. तर, अमरावती जिल्ह्याचे विभाजन करण्यासाठी महाविकासआघाडीचे मंत्री बच्चू कडू आग्रही असल्याची माहिती समोर आली आहे.