Nanded Bus Conductor Suicide: कंडक्टरने बेल वाजवण्याच्या दोरीने बसमध्येचं गळफास घेऊन केली आत्महत्या; नांदेड आगारातील धक्कादायक घटना

संजय यांची सुसाईड नोट वाचल्यानंतर ग्रुपमधील सर्व कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला.

Image used for representational purpose only (Photo Credits: PTI)

Nanded Bus Conductor Suicide: नांदेड जिल्ह्यात अंत्यत धक्कादायक घटना घडली आहे. नांदेड आगारातील एका कंडक्टरने बेल वाजवण्याच्या दोरीने बसमध्येचं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकचं खळबळ उडाली आहे. संजय संभाजी जानकार (Sanjay Jankar) (वय, 53) असं या बस कंडक्टरचं नाव आहे. आज सफाई कामगार आज सकाळी सफाई करत असताना हे प्रकरण उघडकीस आले.

संजय जानकार यांनी एस .टी.बस क्रमांक एम.एच. 20 बी.एल. 4015 मध्ये बेल वाजवण्याच्या दोरीने गळफास घेतला. या घटनेची माहिती मिळताचं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. विशेष म्हणजे जानकार यांनी आत्महत्येपूर्वी चार पाणी सुसाईड नोट लिहून कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सप ग्रुपवर शेअर केली होती. संजय यांची सुसाईड नोट वाचल्यानंतर ग्रुपमधील सर्व कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला. संजय जानकार हे माहुर आगारात वाहक पदावर कार्यरत होते. जानकर यांना पत्नी आणि 2 मुले असा परीवार आहे. (वाचा - Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी पुणे लष्कर कोर्टात पहिला खटला दाखल; 5 मार्चला होणार सुनावणी)

दरम्यान, संजय जानकार यांची दोन दिवसापूर्वी माहूर यवतमाळ माहूर उमरखेड या मार्गावर ड्युटी होती. यावेळी त्यांच्या बसमध्ये माहूरवरुन महागावसाठी तीन फुल्ल आणि एक हाफ तिकीट असलेले प्रवासी चढले. परंतु, मशीमध्ये बिघाड असल्याने साडेतीन ऐवजी एकचं तिकीट प्रिंट झाले. या सर्व घटनेचा संजय जानकार यांनी सुसाईड नोटमध्ये उल्लेख केला आहे.

संजय जानकार यांनी या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे की, ईटीआयएम मशीन नादुरुस्त असल्याने वाहकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. बिघाड असलेल्या मशिनी द्वारे वाहक आपली कामगिरी बजावत आहे. खोट्या अहवालाने आता मला निलंबित केले जाईल. नातेवाईकांसह आणि रा प म कर्मचाऱ्यात माझी बदनामी होईल. सर्वजण मला चोर समजतील. त्यामुळे माझी बदनामी होईल. आगारात सदरची मशीन चेक केली जाईल. बिघाड दुरुस्त करून खोटा अहवाल दिला जाईल आणि मला दोषी ठरविले जाईल. मशीन खराब नसती तर तिकीटं निघाली असती. माझी बदनामी झाली नसती. माझ्या आत्महत्येला प्रशासन जबाबदार आहे, असंही जानकार यांनी म्हटलं आहे.