Palghar: नालासोपारा परिसरातून बेपत्ता झालेल्या 23 वर्षीय महिलेचा मृतदेह नदीत सापडला
13 ऑगस्ट रोजी काही गावकऱ्यांनी मासेमारी करत असताना वैतरणा नदीत मृतदेह तरंगताना दिसला आणि त्यांनी पोलिसांना यासंदर्भात खबर दिली.
Palghar: पालघर जिल्ह्यातील एका 23 वर्षीय महिलेचा मृतदेह बेपत्ता (Missing) झाल्यानंतर दोन दिवसांनी नदीत सापडला. यासंदर्भात पोलिसांनी मंगळवारी पीटीआयला माहिती दिली. पूजा दुबे (Pooja Dube) असे या महिलेचे नाव असून ती 11 ऑगस्ट रोजी नालासोपारा परिसरातून बेपत्ता झाली होती. त्यानंतर तिच्या वडिलांनी तुळींज पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार नोंदवली होती.
पूजाच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे की, ती दुपारी कोचिंग सेंटरमध्ये वर्ग घेण्यासाठी गेली होती, परंतु ती घरी परतली नाही. 13 ऑगस्ट रोजी काही गावकऱ्यांनी मासेमारी करत असताना वैतरणा नदीत मृतदेह तरंगताना दिसला आणि त्यांनी पोलिसांना यासंदर्भात खबर दिली. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि आकस्मिक मृत्यूची नोंद केली. (हेही वाचा- Mumbai Shocker: तारदेव येथे वृद्ध दाम्पत्याचे हातपाय बांधून दरोडेखोरांनी मारला सोन्याच्या दागिन्यावर डल्ला; तोंडावर सेलोटेप लावल्याने 70 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू)
या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले. दरम्यान, सोमवारी दुसऱ्या एका प्रकरणामध्ये पैसे चोरल्याच्या आरोपावरून एका महिलेने रुग्णालयात आपले जीवन संपवले. याप्रकरणी नवी मुंबईतील एका डॉक्टर आणि आणखी एका व्यक्तीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जरिना रेहमान शाह असे या महिलेचे नाव असून, ती आरोपीच्या रुग्णालयात 10 वर्षांपासून काम करत होती.
दरम्यान, 33 वर्षीय महिलेने रुग्णालयात कर्तव्यावर असताना सोमवारी दुपारी गळफास लावून घेतला. त्यानंतर तिच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून डॉक्टर आणि आणखी एका व्यक्तीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुग्णालयात महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना देण्याऐवजी आरोपींनी मृतदेह कोपरखैरणे येथील दुसऱ्या रुग्णालयात नेला. याप्रकरणी आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नसून चौकशी सुरू आहे.