Mumbai Shocker: मुंबईतून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. तारदेव (Tardeo) येथे तीन जणांनी घरात घुसून वृद्ध दाम्पत्याचे हातपाय बांधून घरातून सोन्याचे दागिने (Gold Ornaments) लंपास केले. आरोपींनी दोघांच्या तोंडावर सेलोटेप ( Sellotape) लावला होता. या दरोड्याच्या घटनेत महिलेचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मदन मोहन अग्रवाल (75) हे सकाळी 6.30 वाजता मॉर्निंग वॉकसाठी घरातून निघाले असताना तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांना ढकलून दिले. अग्रवाल यांची पत्नी सुरेखा (70) याही घरात होत्या. या तिघांनी वृद्ध दात्मत्याच्या तोंडावर सेलोटेप लावून त्यांचे हात पाय दोरीने बांधले. (हेही वाचा - Mumbai Crime News:मीरा रोड येथील कोचिंग क्लासच्या मालकावर चाकूने वार, आरोपीचे आत्मसर्पण; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद)
दोघांनाही बांधून ठेवल्यानंतर तिघेही घरातील मौल्यवान सोन्याचे दागिने घेऊन निघून गेले. यानंतर मदन मोहन अग्रवाल यांनी कसेतरी बांधलेले हात-पाय सोडून दरवाजा उघडून शेजाऱ्याला बोलावले. त्यांनी तात्काळ तारदेव पोलिसांना माहिती दिली. (हेही वाचा - Chhatrapati Shivaji Maharaj Hospital: ठाणे महानगर पालिकेच्या रुग्णालयात एका रात्रीत तब्बल 17 रुग्णांचा मृत्यू)
पोलिसांनी घटनास्थळ गाठून पती-पत्नीला नायर रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी सुरेखाला मृत घोषित केले. तारदेव पोलीस आणि मुंबई गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहेत. या धक्कादायक घटनेमुळे तारदेव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.