ठाणे: वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्यांना मिळणार गरमागरम वडापाव

याचा परिणाम वाहतूक कोंडीवर झाल्याने नागरिक त्रस्त आणि संताप व्यक्त करतात. अशातच जर एखाद्याला जबरदस्त भुक लागली असेल तर काय विचारूनच सोय नाही.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

राज्यात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत चालल्याने रस्त्यांवर सुद्धा अधिक वाहतूकीच्या रांगा लागल्याचे दिसून येते. याचा परिणाम वाहतूक कोंडीवर झाल्याने नागरिक त्रस्त आणि संताप व्यक्त करतात. अशातच जर एखाद्याला जबरदस्त भुक लागली असेल तर काय विचारूनच सोय नाही. भुकेने व्याकूळ झालेल्या व्यक्तीची वाहतूक कोंडीमधील अवस्था फक्त तोच सांगू शकतो. मात्र आता ठाणे येथे जर तुम्ही वाहतूक कोंडीत अडकल्यास तुम्हाला हायवेशेजारीच गरमारगमा वडापाळ मिळणार आहे.याबाबत एबीपी माझा यांनी अधिक माहिती दिली आहे.

घोडबंदर ते आनंदनगर येथे पर्यंत वाहतूक कोंडीचा रोजचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागतो. मात्र हायवेवर चालताना सुद्धा काहीच खाण्याची सोय नाही. त्यामुळे सिग्नलच्या नजीक तुम्हाला ट्रॅफिक वडापाववाले तुम्हाला थांबलेले दिसून येणार आहेत. या वडापावसाठी तुम्हाला फक्त 20 रुपये मोजावे लागणार असून पाण्याची बॉटल फ्री सुद्धा दिली जाणार आहे. तर गौरव लोंढे या व्यक्तीने आणि त्यांच्या मित्राने हा अनोखा फंडा सुरु केला आहे . त्यामुळे यांच्याकडील गरमागरम वडापावची सुविधा तुम्हाला दररोज दुपारी 4 ते रात्री 9 पर्यंत मिळणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ही सुविधा नागरिकांसाठी सुरु करण्यात आली आहे. एवढेच नाही तर गौरव लोंढे यांच्या टीमने फेसबुकवरुन सुद्धा त्यांची ओळख वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा जर ठाणे येथे वाहतूक कोंडीत अडकला असल्यास ट्रॅफिक वडापावचा स्वाद घेता येणार आहे. (खवय्या लोकांना आस्वादासाठी नवी पर्वणी; 'गुलाबजाम पिझ्झा'ने घातलीये सगळ्यांनाच भुरळ)

Thane: ठाणे वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्यांना मिळणार गरमागरम वडापाव Watch Video

त्याचसोबत मुंबईत मद्याच्या विक्रीमध्ये घट दिसून आले आहे. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे.  2018 च्या तुलनेत 2019 मध्ये 'बिअर' आणि 'वाईन' च्या विक्रीमध्ये मुंबईत 5.18 टक्के आणि 5.31 टक्के इतकी घट झाली आहे. विशेष म्हणजे या विक्रीमध्ये घट झाल्याने महसूल विभागाला  मोठा तोटा झाला आहे.