RPF Mock Drill Dombivli: मॉक ड्रिल दरम्यान आरपीएफकडून अश्रुधुराचा वापर, नागरिकांचा श्वास कोंडला, डोळ्यांतही जळजळ; डोंबिवली येथील घटना

या वेळी केलेल्या अश्रुधुराच्या चाचणीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.

Smoke | Representational image (Photo Credits: pxhere)

ठाणे (Thane) जिल्ह्याील डोंबिवली येथे इंदिरा नगर (Indira Nagar area of Dombivli) परिसरात रेल्वे सुरक्षा दलाने (Railway Protection Force) मॉक ड्रील (Mock Drill) केले. या वेळी केलेल्या अश्रुधुराच्या चाचणीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. भयभीत झालेल्या नागरिकांना दिलासा देत हे मॉक ड्रिल असल्याचे रेल्वे सुरक्षा दलाने सांगितल्यानंतर परिसरातील ताण काहीसा निवळला.

रेल्वे सुरक्षा दलाने केलेल्या मॉक ड्रीलमुळे परिसरातील लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्यांना जळजळ होऊ लागली. काहींना श्वसनाचा त्रासही जाणवू लागला. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आणि ते घराबाहेर पडले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. थोड्याच वेळात सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन नागरिकांशी संवाद साधला. तसेच, आरपीएफने मॉक ड्रिल करताना अश्रुधुराचा वापर केला आहे. घाबरण्याचे काही नाही आणि काही वेळात हा त्रास संपून जाईल.

तथापि, घाबरलेल्या रहिवाशांनी अशी मागणी केली की कॅम्प शहराच्या आत वसलेला आहे आणि छावणीला जोडलेला असल्याने तेथे अनेक निवासी क्षेत्रे आहेत म्हणून आरपीएफने अशा प्रकारचा सराव टाळावा किंवा किमान त्यांनी आगाऊ माहिती द्यावी. (हेही वाचा, मुंबई: विरार डी-मार्ट येथे पोलिकसांकडून मॉक ड्रील, दहशतवादी पकडल्याची नागरिकांमध्ये चर्चा (व्हिडिओ))

आरपीएफच्या मॉक ड्रिलबाबत बोलताना स्थानिक नागरिकांनी सांगितले की, शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास लहान मुलाच्या डोळ्यात जळजळ होऊ लागली. त्यांना श्वास घेण्यासही त्रास होत होता. ही परिस्थिती काही काळ अशीच राहीली. काही वेळाने परिस्थिती सामान्य झाली. मुलांची प्रकृतीही स्थिर झाली.

काही नागरिकांनी सांगितले की, आरपीएफ कॅम्पमधून धूर येत होता. त्यामुळे नागरिक गोंधळून गेले. त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. जेव्हा पोलिसांनी आम्हाला घाबरू नका असे सांगितले आणि हा प्रकार लवकरच थांबेल असेही म्हटले.

एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याच्या हवाल्याने टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, एक आरपीएफ फोर्स बटालियन आहे जी रेल्वे बोर्ड नियंत्रित करते. स्थानिक पोलिसांची परवानगी घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्या आवारात मॉक ड्रिल केले.