Thane: पाण्याची टाकी साफ करताना ठाणे येथे दोन मजुरांचा गुदमरून मृत्यू
या वेळी टाकी साफ करण्यासाठी टाकण्यात आलेल्या रसायणाचा गॅस तयार झाला. त्यामुळे हे चारही मजूर गुदमरले. त्यातील दोघांचा गुदमरुन मृत्यू झाला. दोघे अत्यावस्थ अवस्थेत सापडले.
पाण्याची टाकी (Water Tank) साफ करताना दोन मजुरांचा गुदमरुन मृत्यू (Death by Suffocation) झाला आहे. तर दोन गंभीररीत्या अत्यावस्थ ( (Critical) आहेत. अत्यावस्थ असलेल्या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ठाणे (Thane) येथील नौपाडा (Naupada) परिसरात असलेल्या नमोनालिसा इमारतीनजीकच्या मराठा मंडळ सांस्कृतीक केंद्र या इमारतीला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याची टाकी स्वच्छ करण्याचे काम सुरु होते. टाकी स्वच्छ करण्यासाठी एकूण चार मजूर टाकीत उतरले होते. या वेळी टाकी साफ करण्यासाठी टाकण्यात आलेल्या रसायणाचा गॅस तयार झाला. त्यामुळे हे चारही मजूर गुदमरले. त्यातील दोघांचा गुदमरुन मृत्यू झाला. दोघे अत्यावस्थ अवस्थेत सापडले.
विवेक कुमार,योगेश नरवणकर, मिथुन कुमार आणि गणेश नरवणकर असे चौघेजण पाण्याची टाकी साफ करण्यासाठी टाकीत उतरले होते. त्यापैकी विवेक कुमार आणि योगेश नरवणकर यांचा टाकी साफ करताना गुदमरुन मृत्यू झाला. तर मिथुन आणि गणेश हे गंभीररीत्या अत्यावस्थ अवस्थेत आढळून आले. मिथुन आणि गणेश यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (हेही वाचा, अंबरनाथ: रंगकाम करण्यासाठी बोलावलेल्यांना कामगारांना दिले टाकीसफाईचे काम, तिघांचा श्वास गुदमरुन मृत्यू)
प्राप्त माहितीनुसार, वरील चौघे जणही एका कंत्राटदाराकडे मजूर म्हणून काम करतात. याच ठेकेदाराने टाकी साफ करण्याचे कंत्राट घेतले होते. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास टाकी साफ करण्याचे काम सुरु झाले. दरम्यान, टाकी साफ करण्यासाठी टाकीत टाकलेल्या रसायणाचे विशारी वायूमध्ये रुपांतर होऊन हे चौघेही गुदमरले. कंत्राटदाराकडे पाण्याची टाकी साफ करण्याचा आवश्यक परवाणा आहे किंवा नाही याबाबत माहिती मिळू शकली नाही. तसेच, टाकीत उतरलेल्या चौघांना टाकी साफ करण्याचे प्रशिक्षण दिले होते किंवा नाही याबाबतही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
ट्विट
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पाण्याच्या टाकीत उतरलेल्या मजुर गुदमरले जाऊन त्यांचा श्वास कोंडू लागला. त्यामुळे त्यांनी टाकीत आरडाओरडा सुरु केला. त्यामुळे त्यांचा आरडाओरडा ऐकून इतर मजुरांनी त्यांना मदत केली आणि बचाव कार्यही सुरु केले. त्यातून दोघांना वाचविण्यात यश आले. मात्र, दोघांना वाचवताना अडथळे येऊ लागल्याने अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोघांना बाहेर काढेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता, अशी माहिती नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी दिली.