ठाणे: भिवंडी मध्ये वीटभट्टी मजुराच्या घरावर कोसळला ट्रक; 3 चिमुकलींचा मृत्यू
विटभट्टीवर लागणारा कोळसा कंटेनर ट्र्कमधून उतरवत असताना अचानक शॉकऑप्सर तुटल्याने घरात झोपलेल्या तीन मुलींवर काळाने घाला घातला.
विटभट्टीवर लागणारा कोळसा कंटेनर ट्र्कमधून खाली करत असताना ट्रॉलीचा शॉकऑप्सर तुटल्याने कोळश्याने भरलेला कंटेनर वीटभट्टी मजुराच्या (Brick Kiln Worker) घरावर कोसळून 3 चिमुकल्यांचा हकनाक बळी गेल्याची घटना ठाण्याच्या (Thane) भिवंडी (Bhivandi) भागात घडली आहे. बुधवार (26 जानेवारी) दिवशी पोलिसांनी या घटनेची माहिती दिली आहे.
दरम्यान या घटनेमधून 2 वर्षांची एक बहीण सुखरूप बाहेर पडण्यामध्ये यश आलं आहे. हा प्रकार मंगळवारी (25 जानेवारी) रात्री घडला आहे. मृत मुलींचे पालक भिवंडी मध्ये वीटभट्टीवर काम करणारे कामगार होते. या दुर्घटनेनंतर पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. त्यामध्ये वीटभट्टी मालकाचादेखील समावेश आहे.
विटभट्टीवर लागणारा कोळसा कंटेनर ट्र्कमधून उतरवत असताना अचानक शॉकऑप्सर तुटल्याने घरात झोपलेल्या तीन मुलींवर काळाने घाला घातला. मृत मुलींचे वय हे 3 ते 7 वर्ष आहे. त्यांचे आई वडील वीटभट्टीवर कामगार म्हणून काम करत होते. हे देखील नक्की वाचा: Andheri Cylinder Gas Leaked मुळे लागलेल्या आगीत तीन जण भाजले तर एकाची प्रकृती चिंताजनक .
पोलिसांनी कलम 304 A अंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपींना कोर्टात दाखल केले आहे. न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.
वीटकामगारांचं घर गवताचं होतं. तिन्ही मुली घरात होत्या तर सगळ्यात लहान मुलगी घराजवळच्या झाडाला कापडी झोपाळ्यात ठेवली असल्याने या अपघातामध्ये सुखरूप बचावली.