Thane: ठाण्याच्या हवाईयन सोसायटीने कॉमन एरियामध्ये कुत्रे फिरवल्याबद्दल सदस्याला ठोठावला 8.38 लाखांचा दंड; एकूण दंडाची रक्कम पोहोचली 14.12 लाखांवर

कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे, लसीकरण प्रमाणपत्रे सादर न केल्याने आणि कुत्र्यांचे अन्न शिजवण्याच्या अस्वच्छ पद्धतींमुळे, इतर सदस्यांना समस्या येत असल्याच्या तक्रारी सुबजितविरुद्ध येत होत्या. त्यानंतर सोसायटीने त्याच्या कुत्र्यांना सोसायटीच्या कॉमन एरियामध्ये फिरवल्याबद्दल दंड ठोठावला.

Thane: ठाण्याच्या हवाईयन सोसायटीने कॉमन एरियामध्ये कुत्रे फिरवल्याबद्दल सदस्याला ठोठावला 8.38 लाखांचा दंड; एकूण दंडाची रक्कम पोहोचली 14.12 लाखांवर
Dog | Pixabay.com

सोसायटीच्या कॉमन एरियामध्ये कुत्रे फिरवल्याबद्दल, एका सदस्याला 5.5 लाख रुपयांचा दंड ठोठावल्यानंतर, ठाण्यातील (Thane) हवाईयन व्हिलेज सोसायटीने (Hawaiian Village Society) त्याच व्यक्तीला आणखी 8.38 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे, ज्यामुळे एकूण दंड 14.12 लाख रुपयांवर पोहोचला. ही व्यक्ती प्राणी कार्यकर्ता आहे. याआधी 29 मे रोजी द फ्री प्रेस जर्नलने वृत्त दिले की, ठाण्यातील घोडबंदर रोडवरील हवाईयन व्हिलेज सोसायटीमधील आपल्या निवासी बंगल्यात पॅराप्लेजिक कुत्र्यांसाठी आश्रयस्थान चालवणारे सुबजित भट्टाचार्य यांना सोसायटीने 5.5 लाख रुपये दंड ठोठावला होता.

कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे, लसीकरण प्रमाणपत्रे सादर न केल्याने आणि कुत्र्यांचे अन्न शिजवण्याच्या अस्वच्छ पद्धतींमुळे, इतर सदस्यांना समस्या येत असल्याच्या तक्रारी सुबजितविरुद्ध येत होत्या. त्यानंतर सोसायटीने त्याच्या कुत्र्यांना सोसायटीच्या कॉमन एरियामध्ये फिरवल्याबद्दल दंड ठोठावला. भट्टाचार्य यांनी दंड भरण्यास नकार दिला होता आणि पीएएल फाउडेशनच्या मदतीने सोसायटीला कायदेशीर नोटीसही बजावली होती. परंतु आता भट्टाचार्य यांना आणखी 8.38 लाख रुपयांचा दंड ठोठावला.

जून महिन्याच्या देखभाल बिलात (Maintenance Bill) कुत्रे फिरवल्याबद्दल 8.0  लाख रुपये, 25,000 रुपये कागदपत्रांचे पालन शुल्क आणि 5,000 रुपये दंड समाविष्ट होता. बिलात गेल्या महिन्यातील थकबाकी व्याजासह जोडण्यात आली आणि एकूण दंड 14.12 लाख रुपयांपर्यंत पोहोचला. भट्टाचार्य म्हणाले, पूर्वी सोसायटीने विविध आरोपांचा उल्लेख केला होता आणि आता त्यांनी कुत्र्याला फिरवल्याचाही दंड ठोठावला आहे. ते म्हणाले, मी दंड भरणार नाही आणि निषेधार्थ फक्त देखभाल खर्च भरणार आहे. मी आधीच सोसायटीला कायदेशीर नोटीस बजावली आहे आणि कालावधी संपल्यानंतर मी कायदेशीर पर्यायांवर पुढे जाईन.

पीएएल फाउंडेशनचे प्राणी हक्क सल्लागार रोशन पाठक म्हणाले, सोसायटीने भट्टाचार्य यांच्यावर लावलेला दंड हा खूप मोठा आहे. तो एक प्रकारची खंडणी आणि छळ आहे. प्रत्येक सोसायटीच्या समिती सदस्यांनी प्राणी जन्म नियंत्रण नियमांचे पालन करावे आणि स्वतःचे कायदे बनवू नयेत. भविष्यात जर आम्हाला सोसायटीकडून बेकायदेशीर शिक्षेचे प्रसंग दिसले तर आम्ही अशा कायदेशीर बाबींमध्ये प्राणीप्रेमींना नेहमीच पाठिंबा देऊ.

(The above story first appeared on LatestLY on Jun 12, 2025 06:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).