Thane: चारित्र्याच्या संशायवरुन बायकोची हत्या, नवऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
ठाणे (Thane) येथे एका 24 वर्षीय नवऱ्याने आपल्या पत्नीवर चारित्र्यावरुन संशय घेत तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. सदर पतीने पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करत तिला जीवंत जाळल्याचे पोलिसांनी शुक्रवारी सांगितले आहे. आकाश कटुआ असे आरोपीचे नाव आहे. त्याला आता पोलिसांनी या प्रकरणी बेड्या ठोकल्या आहेत.(मुंबई: मालाड मध्ये एका 55 वर्षाच्या प्रियकराचा 58 वर्षीय प्रेयसीवर जीवघेणा हल्ला, पीडितेवर चाकूने वार करुन स्वत:च्या तोंडात फोडला सुतळी बॉम्ब, दोघेही गंभीर जखमी)
कळवा येथे हे दोघे एका चाळीत राहतात. या दोघांमध्ये काही कारणावरुन जोरदार भांडण झाले. हे भांडण ऐवढे टोकाला गेले की नवऱ्याने बायकोवर चक्क चाकू हल्ला करत तिला जीवंत जाळले. नवऱ्याला बायकोच्या चारित्र्यावर संशय असल्याने असा प्रकार घडल्याचे ही पोलिसांनी पुढे म्हटले आहे. दरम्यान, आरोपीने पत्नीची गळा चिरुन हत्या करण्यासह तिला जिवंत जाळल्याप्रकरणी त्याच्या विरोधात हत्येच्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Jaisalmer: धक्कादायक! विधवा महिलेचा पुनर्विवाहास नकार; संतापलेल्या सासरच्या मंडळींनी कापले नाक व जीभ)
तर काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये एका 22 वर्षीय महिलेला पेयातून गुंगीचं औषध देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली होती. यासंदर्भात पीडित महिलेने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित महिलेने तक्रारीत असे म्हटले आहे की, मित्राने आयोजित केलेल्या पार्टीमध्ये तिला गुंगीचं औषध देण्यात आले होते. सदर पीडित महिला 8 नोव्हेंबर 2020 रोजी आपल्या मित्रांसोबत एका पार्टीमध्ये गेली होती. ही पार्टी अंधेरीतील तिच्या मित्राच्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आली होती. यावेळी तिच्या पेयात आरोपींनी गुंगीचे औषध दिले. यावर पीडित महिलेने हे पेय पिल्यानंतर ती बेशुद्ध झाली. तेव्हाच तिच्यावर बलात्कार करण्यात आला, असे पोलिसांनी म्हटले होते.